MLA Shivendrasinharaje Bhosle esakal
सातारा

लवकरच उरमोडीचे पाणी काशीळपर्यंत पोचेल; आमदार शिवेंद्रसिंहराजेंची ग्वाही

शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून मार्गी लागलेल्या उरमोडी उजवा कालव्यातून धरणाचे पाणी सोडण्यात आले.

उमेश बांबरे

सातारा : सातारा तालुका सुजलाम सुफलाम व्हावा, तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकाला हक्काचे पाणी मिळावे म्हणून (कै.) भाऊसाहेब महाराजांनी उरमोडी धरण बांधून जलक्रांती घडवली. आज उरमोडी धरणाचे (Urmodi Dam) पाणी सातारा तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या शिवारात पोचले असून, (कै.) भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साकार झाले आहे. लवकरच काशीळपर्यंत उरमोडीचे पाणी पोचेल आणि संपूर्ण तालुक्‍याचा पाणीप्रश्न सुटेल, असा विश्‍वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosle) यांनी व्यक्त केला. (MLA Shivendrasinharaje Bhosle Will Give Water Of Urmodi Canal To Kashil Citizens)

शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून मार्गी लागलेल्या उरमोडी उजवा कालव्यातून धरणाचे पाणी सोडण्यात आले. करंडी, उपळी या गावांमधून जाणाऱ्या या कालव्यात शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, सातारा पालिकेचे नगरसेवक धनंजय जांभळे, करंडीचे सरपंच शशिकांत जाधव, पोगरवाडीच्या सरपंच सुलाबाई लोहार, उद्धव घोरपडे, उपळीच्या सरपंच मंगल पवार, संदीप पवार, आष्टेचे उपसरपंच सुनील भोसले, झरेवाडीच्या सरपंच ज्योती नगरे, सुमन पवार, अमोल काटकर उपस्थित होते.

उरमोडी धरणाच्या उजव्या कालव्यामुळे अंबवडे, भोंदवडे, गजवडी, सोनवडी, आरे, पोगरवाडी, झरेवाडी, करंडी, उपळी, आष्टे, शेळकेवाडी आदी गावांतील सुमारे चार हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. पाणी शिवारात पोचल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करून शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानले. दरम्यान, पुढे काशीळपर्यंत जाणाऱ्या या कालव्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा आणि उजव्या कालव्याच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न संपुष्टात आणा, अशा सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

अजिंक्‍यतारा किल्ल्यावर फिरणाऱ्यांची धरपकड; 35 जणांवर गुन्हा

MLA Shivendrasinharaje Bhosle Will Give Water Of Urmodi Canal To Kashil Citizens

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT