Monika Kamble became judge Tradition of Jogati satara sakal
सातारा

वंचित घटकांतील मोनिका झाली न्यायाधीश

वाठार स्टेशनच्या कन्येने प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन युवकांपुढे आदर्श

राजेंद्र वाघ

कोरेगाव : जोगती पंथाची परंपरा असलेल्या कुटुंबात कोणीही फारसे शिक्षित नसताना या कुटुंबातील मुलगी महाविद्यालयातील शिक्षणादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झाली. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असतानाही खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन पदवीधर, वकील व आता दिवाणी न्यायाधीश झालेल्या वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथील अॅड. मोनिका कांबळे या ध्येयवेड्या युवतीने शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवत केवळ वंचित घटकांतीलच नव्हे, तर समग्र समाजातील युवक-युवतींपुढे आदर्श ठेवला आहे.

वाठार स्टेशन येथील कांबळे आडनाव असलेल्या एका कुटुंबात जोगती पंथाची परंपरा आहे. कोणीही फारसे शिक्षित नसलेल्या या कुटुंबातील मुलगी मोनिका गावातील शाळेत शिक्षणाचे धडे गिरवू लागली. दुसरीकडे मोनिकाची आजी शकुंतला कांबळे या जोगती पंथाच्या कामाचा भाग असलेल्या कार्यक्रमांना गावोगावी जायच्या. त्यातून होणारे अर्थार्जन हाच घर चालवण्यासाठी एकमेव आधार होता. शाळेच्या सुटीदिवशी मोनिकाही आजीच्या मदतीला जाऊन कार्यक्रमांमध्ये वादन काम करत असे. शाळेत हुशार असल्याने मोनिका त्यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात पहिली आली. नात मोनिका शिकत असल्याचे अशिक्षित आजीला अप्रूप वाटे. पुढे गावातीलच वाग्देव महाविद्यालयामध्ये सुरू केलेल्या पदवीच्या शिक्षणादरम्यान मोनिका प्रत्येक शैक्षणिक उपक्रमात भाग घेऊन बक्षिसे मिळवू लागली. त्यावेळी चळवळीतील कार्यकर्ते अमोल आवळे वाठार स्टेशन ग्रामपंचायतीचे सदस्य होते व पुढे ते सरपंच झाले.

या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहत असताना श्री. आवळे यांना मोनिकामधील चुणूक दिसली होती. त्यानंतरच्या संपूर्ण घटनाक्रमाविषयी सांगताना मोनिका म्हणाली, की ''शिक्षणानंतर पुढे काय करणार?'' असा प्रश्न मला अमोल आवळे यांनी केला. त्यावर ''पदवीधर व्हायचे आहे'', एवढेच मी सांगितले, कारण पुढच्या शिक्षणाविषयी मला काहीच माहिती नव्हते. तेव्हा आवळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके वाचण्याचा, त्यांच्या विचारांनुसार चालण्याचा व वकील होण्याचा सल्ला दिला. त्यासाठी लागेल ती मदत देण्याचा शब्द देऊन बाबासाहेबांची पुस्तके दिली. त्यानुसार शिक्षण घेत बाबासाहेब यांना समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. पदवीधर झाले, पुढे सातारा येथील ईस्माइलसाहेब मुल्ला विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली. कोल्हापूर येथून ''एलएलएम'' व ''पीजीडीएचआर'' केले. त्यासाठी ''भारतातील देवदासी प्रथा : सातारा जिल्ह्यातील समस्या आणि पुनर्वसन'' या विषयावर प्रबंध सादर केला. त्यानंतर वकिलीची प्रॅक्टिस सुरू ठेवत आवळे यांच्या सल्ल्यानुसार न्यायाधीशपदासाठी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. वेळोवेळी अॅड. किशोर खराडे यांचे मार्गदर्शन लाभले. पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आले; परंतु खचून न जाता पुन्हा जिद्दीने परीक्षेला सामोरे गेले आणि यशस्वी झाले.

आजी शकुंतला यांच्या पाठबळासह अमोल आवळे यांनी दाखवलेली दिशा व त्यांनी पावलोपावली केलेल्या सर्वतोपरी मदतीमुळेच मी दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) या पदापर्यंत पोचू शकले, अशा शब्दांत मोनिकाने तिच्या या टप्प्यापर्यंतच्या प्रवासाची माहिती दिली.

मार्गदर्शक बनला जीवनसाथी

मोनिका म्हणाली,‘‘माझ्या संपूर्ण यशात अमोल आवळे यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी आजपर्यंत दिलेली साथ यापुढेही कायम राहावी, यासाठी आम्ही दोघे नुकतेच विवाहबद्ध झालो आहोत. यापुढे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील गरीब, गरजू युवक, युवतींसाठी त्यांना परवडणाऱ्या माफक दरात पुणे, मुंबईसारख्या सुविधा असलेले मार्गदर्शन केंद्र, अभ्यासिका सुरू करण्याचा आम्हा उभयतांचा मानस आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT