जून-ऑक्टोबर दरम्यान तृण, कंद, वेली, वृक्ष, झुडपे, ऑर्किड, डबक्यातील वनस्पतींना अत्यंत आकर्षक निळ्या-जांभळ्या, लाल रंगाची फुले येतात.
कास : जागतिक वारसा स्थळ कास पठारावर (Kaas Plateau) कास पठार कार्यकारी समिती (Kas Pathar Committee) व वनविभागाच्या वतीने पर्यटकांसाठी पावसाळी पर्यटन सुरू झाले आहे. पुष्प पठाराचे सौंदर्य स्वानुभवताना पर्यटकांत (Tourists) उत्साहाचे वातावरण आहे. नैसर्गिक मंडपघळ, भदार तळे, मचान, कुमुदिनी तलावसह विविध पॉइंटकडे पर्यटक आकर्षित होत आहेत.
निसर्गरम्य परिसर चोहोबाजूला दाट हिरवीगार झाडी, पावसाची संततधार, धुक्याची दुलई, फेसाळणारे धबधबे, निसर्गाचे वरदान असलेले कास पठार, कास धरण पर्यटनस्थळी जिल्हा, राज्यभरातून पर्यटकांची वर्दळ सुरू असून, पठारावरील विविध पॉइंट खुले करण्याची मागणी पर्यटक करत होते. फुलांच्या राखीव क्षेत्रात पर्यटक जाऊ नयेत, यासाठी सुरक्षिततेसाठी कर्मचारी दिवसभर कर्तव्य बजावत आहेत. पठाराचे संवर्धन, संगोपन करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात शुल्क आकारणी सुरू आहे.
जून-ऑक्टोबर दरम्यान तृण, कंद, वेली, वृक्ष, झुडपे, ऑर्किड, डबक्यातील वनस्पतींना अत्यंत आकर्षक निळ्या-जांभळ्या, लाल रंगाची फुले येतात. मध्य ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये विविध रंगीत दुर्मिळ फुलांचे गालिचे पर्यटकांना आकर्षित करतात. काही तुरळक फुलांचा, कुमुदिनीच्या फुलांचा बहर मावळेपर्यंत नोव्हेंबर जातो. फुलांसाठी सध्या पोषक वातावरण असून, अद्याप फुलांचा हंगाम सुरू नसून ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फुलांचा हंगाम सुरू होईपर्यंत पावसाळी पर्यटनात प्रतिव्यक्ती पन्नास रुपये शुल्क आकारून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने राजमार्गावरून कुमुदिनी तलाव, कास धरण दर्शन मचाण, नैसर्गिक मंडपघळ, भदार तळे पॉइंट पर्यटकांसाठी खुले झाल्यामुळे पर्यटकांना कासचे पर्यटन घडत आहे. पर्यटकांसमवेत सुरक्षा कर्मचारी असून, सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पर्यटन सुरू आहे.
वनसंपदेचे रक्षण, पर्यटकांना सोयीसुविधा, स्थानिकांना रोजगाराचे उद्दिष्ट ठेवून विविध पॉइंटच्या निसर्गसौंदर्याचा आनंद मिळवण्याच्या हेतूने पर्यटकांच्या मागणीनुसार पावसाळी पर्यटन सुरू केले आहे. पर्यटनावेळी फुलांच्या क्षेत्रात प्रवेश होणार नाही, याची दक्षता घेऊन वनविभागाच्या सूचनांचे पालन करून समिती सुरक्षा कर्मचाऱ्यांना पर्यटकांनी सहकार्य करावे.
-सोमनाथ जाधव, सदस्य, कास पठार कार्यकारी समिती.
पठारावरील विविध पॉइंट पाहण्यास खुले केले असले, तरी फुलांच्या राखीव क्षेत्रात पर्यटनास पूर्णत: बंदी आहे. कोणी प्रवेश केलास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, प्रतिव्यक्ती पन्नास रुपये तात्पुरते शुल्क आकारून पावसाळी पर्यटन येत्या फुलांचा हंगाम सुरू होईपर्यंत राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.