RanjitSingh Naik-Nimbalkar esakal
सातारा

ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं आरक्षण रद्द

किरण बोळे

फलटण शहर (सातारा) : महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) ओबीसी समाजाचा (OBC Community) विश्वासघात केला आहे. या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण (OBC Reservation) रद्द झाल्याचा आरोप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (MP RanjitSingh Naik-Nimbalkar) यांनी केला आहे. ओबीसी समाजास आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या वतीने खासदार निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच नायब तहसीलदार विजय चांदगुडे यांना देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

राज्यात महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द केले आहे.

खासदार निंबाळकर म्हणाले, ‘‘राज्यात महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द केले आहे. राज्य सरकारला एम्पिरिकल डाटा तयार करून हे आरक्षण वाचवता आले असते; परंतु या सरकारला ओबीसी समाजावर अन्यायच करायचा दिसत आहे. न्यायालयामध्ये राज्य शासनाने योग्य भूमिका मांडली नाही. परिणामी, ओबीसी समाजावर मोठा अन्याय होणार आहे. भविष्यातील कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी समाजातील चांगल्या व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नाही. महाविकास आघाडी सरकारचा भाजपच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो.’’ ओबीसी समाजावरील अन्याय दूर न झाल्यास भविष्यात पक्षाच्या वतीने माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.

MP RanjitSingh Naik-Nimbalkar

या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, नगरसेवक अशोकराव जाधव, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, युवा नेते अभिजित निंबाळकर, महिला आघाडीच्या जिल्हा सचिव मुक्ती शहा, शहराध्यक्ष विजया कदम, नगरसेवक सचिन अहिवळे, ओबीसी सेलचे अध्यक्ष राजेश शिंदे, युवा मोर्चाचे सोमनाथ एजगर, नितीन वाघ, नीलेश चिंचकर, शशिकांत रणवरे, शरद झेंडे, सूरज तांदळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT