सातारा लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
विधानसभेच्या मतदार संघाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्रीनिवास पाटलांनी आपली लोकसभेची उमेदवारी नाकारली आहे. त्यांनी निवडणुकीची उमेदवारी नाकारताना आपल्या तब्येतीचे कारण सांगितले आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातून श्रीनिवास पाटलांनी माघार घेतल्यानंतर आता त्यांच्या जागी कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत अनेक शक्यता वर्तवण्यात येत आहेत. दरम्यान, बाळासाहेब पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. बाळासाहेब पाटील हे राज्याच्या सहकार विभागाचे कॅबीनेट मंत्री राहिलेले आहेत. ते कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.
श्रीनिवास पाटलांनी आपली उमेदवारी नाकारल्यानंतर आता शरद पवार कोणाला संधी देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.