Udayanraje Bhosale esakal
सातारा

जिल्हाधिकारी शेखर सिंह 'या' 25 प्रश्‍नांची उत्तरं द्या; खासदार उदयनराजेंचं थेट आव्हान

गिरीश चव्हाण

सातारा : कोरोनाविषयी (Coronavirus) जनतेच्या मनात असणाऱ्या 25 प्रश्‍नांची उत्तरे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी आज जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांच्याकडून मागवली आहेत. यासाठीच्या प्रश्‍नावलीत उत्तर देण्याचे आव्हान करतानाच उत्तर देणार, की कायदेशीर ताकद दाखवणार? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबतचे पत्रक खासदार उदयनराजे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आले आहे. (MP Udayanraje Bhosale Asked District Collector Shekhar Singh 25 Questions)

कोरोनामुळे सर्वसामान्यांचे नुकसान झाले असून, त्यामुळे कोरोना हे मोठे षडयंत्र असल्याची भावना त्यांच्या मनात ठसत आहे.

यात म्हटले आहे की, कोरोनामुळे सर्वसामान्यांचे नुकसान झाले असून, त्यामुळे कोरोना हे मोठे षडयंत्र असल्याची भावना त्यांच्या मनात ठसत आहे. रेमडेसिव्हिरवर (Remdesivir Injection) बंदी असतानाही ती अँटी व्हायरल म्हणून कोणी आणि कोणत्या आधारे वापरण्यास परवानगी देण्यात आली. रेमडेसिव्हिर आणि स्टेरॉईडमुळे म्युकरमायकोसिसचा निष्कर्ष असतानाही ती का वापरण्यात आली? हा प्रश्‍न जनतेच्या मनात आहे. जनतेच्या मनात कोरोना, औषधपद्धती व इतर बाबींविषयी अनेक प्रश्‍न असून, लोकप्रतिनिधी म्हणून त्याची उत्तरे मागणे माझी जबाबदारी असल्याचेही उदयनराजे यांनी पत्रकात नमूद केले आहे.

corona

याबाबत जिल्हाधिकारी सिंह यांना दिलेल्या पत्रात विचारले आहे, की कोविडवर नेमके औषध (Medicine) उपलब्ध आहे का? असल्यास त्यापैकी आपल्याकडे कोणते आहे? नेमके औषध नसेल तर गेले वर्षभर कोणत्या औषधांचा वापर उपचारासाठी झाला? उपचारापद्धतीतील औषधांचा काळाबाजार झाला व नंतर ती बंद करण्यात आली, मृताची ऍटॉप्सी का केली जात नाही? एकाच व्यक्‍तीच्या वेगवेगळ्या तपासण्यांमध्ये वेगवेगळे निष्कर्ष कसे येतात? लॉकडाउन असतानाही रुग्णसंख्या वाढीची कारणे काय? रुग्णसंख्येचा वेग मंदावण्यास उशीर का झाला? आकडेवारीतील घोळामुळे रुग्णसंख्या वाढत होती का?

अहवाल सादर करण्यात वेळ येत होता तर बाकी माहिती जाहीर होताना बाधितांचा आकडा काय? अहवालातील घोळाप्रकरणी दोषींवर काय कारवाई केली? कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग का झाले नाही, तिसरी लाट येणार असल्याचे सांगत असताना त्यामागील आधार काय, फिरणाऱ्या नागरिकांची जबरदस्तीने तपासणी करणे कोणत्या नियमावलीत बसते, वीकेंड लॉकडाउनसाठी (Weekend lockdown) कोणता तर्क, आधार लावला आहे, आयुर्वेदिक उपचारपद्धतीला शासन अधिकृतता का देत नाही? असे पंचवीस प्रश्‍न विचारण्यात आले आहेत. हे प्रश्‍न सर्वसामान्य, कष्टकरी, सर्व स्तरातील नागरिकांनी उपस्थित केले असून, आम्हालाही लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्या तळाशी जाणे आवश्‍यक वाटते. या प्रश्‍नांची समर्पक, विस्तृत उत्तरे जनतेच्या हितासाठी आपण द्याल, अशी अपेक्षाही उदयनराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून व्यक्‍त केली आहे.

MP Udayanraje Bhosale Asked District Collector Shekhar Singh 25 Questions

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT