सातारा

आरक्षणामुळे चांगले मित्र गमावत चाललोय, उदयनराजेंनी व्यक्त केली खंत

Balkrishna Madhale

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. तीच शिकवण आजही अंमलात आणणं अपेक्षित आहे. मात्र, आज या आरक्षणामुळे आपण चांगले मित्र गमावत चाललोय. एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चाललोय, याचं फार वाईट वाटतंय, अशी खंत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (गुरुवार) साता-यात व्यक्त केली. तसेच त्यांनी असंच जर सुरु राहिले तर एकदिवस मोठा उद्रेक होईल, असा ठाम इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

उदयनराजे पुढे म्हणाले, माझ्याकडे सर्व जाती धर्माचे लोक येतात. त्यांचे मी सन्मानाने स्वागतच करतो. मी कधीच कोणाची जात पाहत नाही, कारण मी माणूस पाहतो. लहानपणी मी देखील विविध जातीधर्माच्या मुलांसोबत गोट्या, विटी-दांडू, क्रिकेट खेळायचो, तेव्हा आपण कोणाची कधीच जात पाहिली नाही. गुण्यागोविंदाने नांदत होतो. मात्र, या आरक्षणामुळे आता एकमेकांतला संवाद आता दुरावत चालाय, हे फारच वाईट आहे. जातपात कोणी निर्माण केली, माणसानेच ना.., मग आपण भेदभाव करणारे कोण?, या आरक्षणामुळे माणसं दुरावत चालली आहेत. कोणत्याही जातीजमातीचे अधिकार काढून घेवू नका. मराठा, धनगर, मुस्लीम यांना त्यांच्या अपेक्षप्रमाणे त्यांचा अधिकार द्यावा. माझ्यापेक्षा अनेकजण मोठे आहेत. मात्र, मला कोणाशी वाद घालायचा नाही, पण मुलागा या नात्याने सर्वांना विचारण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून प्रत्येकाला संधी दिली गेली, त्यात कधीच कोणाची जात पाहिली नाही. आपल्या देशात लोकशाही आहे आणि या लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला संधी मिळणे हे मी क्रमप्राप्त समजतो. कोणी एखाद्याला नावं ठेवलं म्हणजे तो मोठा होतं नसतो. कारण, त्याच्या कामावरुनच त्याचं आपोआप नाव निघत असतं. मी कोणतीही निवड संगनमताने करत असतो, त्यात कोणतंही राजकारण नसतं. कारण माझी निवड ही गुणवत्तेवरच आधारित असते, असे उदयनराजेंनी शेवटी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Uddhav Thackeray: सरकार कुणी पाडलं, राज ठाकरेंबरोबर जाणार का? उद्धव ठाकरे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT