'जे लोक माझ्यावर टीका करताहेत, त्यांचं माझ्यावर भरपूर प्रेम आहे.'
कास (सातारा) : सातारा पालिकेची निवडणूक जशी जवळ येत आहे, तश्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. साताऱ्यातील दोन्ही राजेंमध्येही चांगली जुपल्याचं चित्र आहे. जे लोक माझ्यावर टीका करताहेत, त्यांचं माझ्यावर भरपूर प्रेम आहे. माझं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवस चांगला जात नाही. माझे मुख्य प्रचारक म्हणून ते काम आहेत, असा टोला खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinghraje Bhosale) यांना लगावला.
आजपासून तीन दिवस सातारा जिल्हाधिकारी, वन विभाग आणि पर्यटन विभाग यांच्या वतीनं कास महोत्सवाचं (Kaas Festival) आयोजन करण्यात आलं आहे. त्यावरुन काही सामाजिक कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधींनी आक्षेप नोंदविले आहेत. या ठिकाणी वृक्षतोड देखील झाली आहे. त्यामुळं पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही या महोत्सवाबाबतच्या आयोजनात काही चुकीच्या गोष्टी घडल्या असल्याचं म्हटलंय. त्याबाबतची तक्रार शासनाकडं करणार असल्याचं शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केलं. त्यानंतर उदयनराजेंनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.
आमदार शिवेंद्रराजेंच्या टीकेबद्दल माध्यमांनी उदयनराजेंना छेडलं असता, त्यांनी हा महोत्सव शासनानं आयोजित केलाय. पैसा शासनाचा, स्टाॅलधारक या भागातील आहेत, यामध्ये माझा काय संबंध? मी फक्त यात पुढाकार घेतलाय. ही कल्पना दुसऱ्या कोणाला का सूचली नाही. माझं तर असं म्हणणं आहे, की ज्यांनी कोणी परिसरात झाडं तोडली त्यांच्यावर कारवाई करावी. प्रत्येक वेळेस पैसा-पैसा.. काय करायचं पैशाचं, मला कळत नाही. यामधला मला काय पैसा मिळणार आहे? कमानीचा ठेका मला मिळाला असता तर बरं झालं असतं, असंही उदयनराजेंनी नमूद केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.