सातारा

सातारा : राजकारणात साधणार उदयनराजे बेरजेचे गणित

गिरीश चव्हाण

सातारा : सातारा नगरपालिकेचे उपाध्यक्ष किशोर शिंदे यांचा कार्यकाल पूर्ण झाला असून या जागेसाठी सातारा विकास आघाडीतील (साविआ) अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या आघाडीतील मनोज शेंडे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत असून त्यावर आगामी काळात खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. उपाध्यक्षपदासह स्वीकृत नगरसेवकांच्याही नियुक्‍त्या होणार असून त्यावेळी सातारा नगरपालिकेत नव्याने सहभागी झालेल्या उपनगरांसह त्रिशंकू भागातील जनाधार असणाऱ्यांना स्थान देण्याचे नियोजन "साविआ'ने केले आहे.

तहसिलदारांचे चेकबुक चोरुन शासकीय कर्मचा-याने लाटले लाखाे रुपये 

सातारा पालिकेत सातारा विकास आघाडीचे वर्चस्व असून प्रादेशिक राजकीय समतोल राखण्यासाठी उपाध्यक्षपदी अनेकांना संधी देण्यात येत आहे. सध्या सातारा पालिकेच्या उपाध्यक्षपदी किशोर शिंदे कार्यरत आहेत. आघाडींतर्गत ठरविलेला कालावधी संपल्याने यापदी वर्णी लागावी, यासाठी "साविआ'तील अनेक इच्छुकांनी नेत्यांना साकडे घालण्यास सुरवात केली आहे. सातारा शहराची नुकतीच हद्दवाढ झाली असून पालिकेत सहभागी झालेल्या नवीन भागावर असणारी राजकीय पकड कायम ठेवण्यासाठी "साविआ'ने मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार आघाडीतील सदस्यांची मते जाणून घेण्यात आली असून सर्वाधिक सदस्यांनी नगरसेवक मनोज शेंडे यांना उपाध्यक्षपदासाठी पसंदी दर्शवली आहे. शेंडे यांना संधी दिल्यास करंजेसह पालिकेत नव्याने सहभागी झालेल्या दौलतनगर व इतर भागातील उदयनराजेंची राजकीय गणिते मजबूत होणार आहेत. याच पदासाठी श्रीकांत आंबेकर यांचेही नाव चर्चेत होते. आंबेकरांकडे विषय समितीचे सभापतिपद असल्याने त्यांचे नाव नंतर मागे पडले.

संसर्गाच्या काळात पैशापैक्षा माणुसकी ठरतीय श्रेष्ठ : डॉ. प्रवीण चव्हाण
 
"साविआ'कडून स्वीकृत नगरसेवकपदासाठीही चाचपणी करण्यात आली आहे. शाहूपुरीसह इतर भागाचा सातारा पालिकेत समावेश झाल्याने या ठिकाणचे पंचायत समिती सदस्य संजय पाटील यांचे पद शासनाने रद्द केले आहे. हे पद रद्द झाल्याने सातारा पंचायत समितीतील उदयनराजे गटाचा एक सदस्य कमी झाला असून त्या सदस्याचे नव्याने राजकीय पुनर्वसन नगरसेवक म्हणून होण्याची शक्‍यता आहे. स्वीकृत नगरसेवकपदासाठी चर्चेत असलेल्या चार नावांपैकी दोन नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळत आहे.

शिवेंद्रसिंहराजे समर्थकांचे बायोमायनिंग प्रकल्पाविरोधात आंदोलन 

संजय पाटील यांचा दावा प्रबळ 

हद्दवाढ झाल्याने शाहूपुरीसह इतर भाग सातारा नगरपालिकेत सहभागी झाला आहे. हद्दवाढ झाल्याने पंचायत समितीचे सदस्य संजय पाटील यांचे पद शासनाच्या नियमानुसार रिक्‍त झाले. शाहूपुरी आणि संजय पाटील हे राजकीय समीकरण गेल्या काही वर्षांत जुळले असून त्यांच्यापुढे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा गट निष्प्रभ आहे. उदयनराजेंचा गड राखण्याचे काम संजय पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोसावी हे करत आहेत. गोसावी यांचे नावही सध्या स्वीकृतसाठी चर्चेत असले तरी त्या पदावर पाटील यांची वर्णी लागावी, यावर काही जण आग्रही आहेत.

..अखेर दहा आंतरजातीय जाेडप्यांना ग्रामस्थांनी स्वीकारले

शाहूनगरसह त्रिशंकू भागालासुध्दा पालिकेत प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न "साविआ'कडून सुरू आहे. शाहूपुरी इतकाच शाहूनगर व त्रिशंकूसह इतर भाग राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने या भागातून युवा नेते संग्राम बर्गे यांचे नाव पुढे येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT