सातारा : भाजपाचे खासदार उदयराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्याची माहिती नुकतीच समोर आली असून पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये (Ruby Hospital Pune) उदयनराजे यांच्यावर गेल्या ४ दिवसांपासून उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीतून परतल्यानंतर खासदार उदयनराजेंना कोरोनाची लागण झाली, तर खासदार उदयनराजेंच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले (Kalpanaraje Bhosle) या सुरुवातीला कोरोनाबाधित झाल्या होत्या. त्या बऱ्या झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, पुन्हा त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मातोश्री कल्पनाराजेंना रुग्णालयात दाखल केल्याचे समजल्याने खासदार उदयनराजे दिल्लीहून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पुण्यात आले होते.
मातोश्री कल्पनाराजेंना रुग्णालयात दाखल केल्याचे समजल्याने खासदार उदयनराजे दिल्लीहून अधिवेशन (Delhi Convention) सोडून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पुण्यात आले होते. यावेळी मातोश्रींच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनाही त्रास होऊ लागला होता. त्यानंतर काही लक्षण आढळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता उदयनराजेंची प्रकृती उत्तम असल्याचे त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलेय. तसेच, पुढील एक-दोन दिवसात त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, असे देखील त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे, तर त्यांच्या मातोश्रींची प्रकृतीही उत्तम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.