सातारा : राज्य शासनाने विशेष बाब म्हणून सातारा नगरपालिकेच्या (Satara Municipality) प्रशासकीय इमारतीसाठी भरीव निधी मंजूर करावा, नगरपालिकेच्या हद्दवाढीच्या चौफेर विकासासाठी अतिरिक्त निधी मिळावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांच्याकडे केली. दरम्यान, हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासासाठी १७ कोटींचा निधी तसेच प्रशासकीय इमारतीसाठी नगरविकास विभागाकडून प्रथम १० कोटींचा निधी उपलब्ध केला जाईल, असे आश्वासन मंत्री शिंदे यांनी दिले. (MP Udayanraje Bhosale Met On Minister Eknath Shinde Satara Marathi News)
पद्मश्री बाबासाहेब कल्याणी यांनी एक रुपया नाममात्र किमतीत सुमारे ४० गुंठे जागा सातारा पालिकेच्या नावावर करून दिली आहे.
सह्याद्री अतिथीगृहात उदयनराजेंनी मंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत विविध विषयांवर सुमारे दोन तास चर्चा झाली. उदयनराजे म्हणाले, ‘‘पद्मश्री बाबासाहेब कल्याणी (Padmashri Babasaheb Kalyani) यांनी एक रुपया नाममात्र किमतीत सुमारे ४० गुंठे जागा सातारा पालिकेच्या नावावर करून दिली आहे. आजच्या युगातही मातृसंस्थेसाठी असे दानशूर कोट्यवधी रुपयांची जागा देतात, हे सातारकरांचे भाग्य आहे. ही जागा आत्ताच्या हद्दवाढीत सातारा शहराच्या मध्यवर्ती आहे. या जागेत नगरपालिकेची सुसज्ज अशी मुख्य प्रशासकीय इमारत उभारण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. पुण्याचे आर्किटेक्ट श्री. भंडारी यांनी तयार केलेल्या आराखड्यासाठी नेमलेल्या ज्युरी पॅनेलव्दारे निवडण्यात आलेले आहेत.
विविध पदाधिकाऱ्यांची सुसज्य दालने, कॉन्फरन्स हॉल, व्हिसी हॉल, नगरपालिकेचे अद्ययावत सभागृह, विश्रांतीगृह, कर्मचारी आणि अभ्यागतांसाठी उपहारगृह, अभ्यागतांसाठी अभ्यागत कक्ष यांसह विविध सुविधांसह बहुमजली इमारत उभी करण्यात येणार आहे. त्यासाठी ६० कोटींपेक्षा जास्त रक्कम अंदाजित करण्यात आलेली आहे. हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासासाठी सुमारे १७ कोटींचा निधी लवकरच प्रदान करण्यात येईल. तसेच प्रशासकीय इमारत होण्याची गरज विचारात घेऊन नगरविकास विभागाकडून प्रथम १० कोटींचा निधी उपलब्ध केला जाईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी खासदार उदयनराजे यांना दिले. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे (Deputy Mayor Manoj Shende), नगरसेवक ॲड. डी. जी. बनकर, काका धुमाळ, ॲड. विनित पाटील आदी उपस्थित होते.
लवकरच प्रशासकीय इमारतीची पायाभरणी आणि हद्दवाढ भागातील अत्यावश्यक व गरजेच्या बांधकामास सुरुवात करण्यात येईल.
-उदयनराजे भोसले, खासदार
MP Udayanraje Bhosale Met On Minister Eknath Shinde Satara Marathi News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.