सातारा : गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित राहिलेला सातारकरांचा हद्दवाढीचा प्रश्न अखेर मार्गी लागला. साधारणपणे तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर हद्दवाढ झालेल्या भागासह नव्याने पालिकेची निवडणूक लागू शकते; परंतु सातारा पालिकेची निवडणूक पुढील वर्षातच लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक वाढीव भागासह होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.
सातारा शहराच्या हद्दवाढीसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याचा प्रतिसाद देत पवारांनी हद्दवाढीचा अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या प्रश्न नुकताच मार्गी लावला. हद्दवाढीचे पत्र त्यांनी मंगळवारी (ता.आठ) मंत्रालयात शिवेंद्रसिंहराजेंकडे सपूर्द केले. सातारा पालिकेच्या हद्दवाढीमुळे पालिकेचे क्षेत्र 8.7 चौरस किलोमीटरवरून सुमारे 12 चौरस किलोमीटर इतके होणार आहे.
सातारच्या हद्दवाढीबाबत उदयनराजेंची ही भावना; या नेत्याला दिले सर्व श्रेय!
पालिका हद्दीतील शहराची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार एक लाख 29 हजार इतकी आहे. त्यामध्ये आतापर्यंत किमान दुप्पट वाढ झालेली आहे. त्यातच वाढीव भागातील दीड ते पावणेदोन लाख लोकसंख्येची शहरामध्ये भर पडणार आहे. त्यामुळे 2021 च्या जनगणनेमध्ये सातारा शहर साडेतीन ते चार लाख लोकसंख्येचे होणार आहे. एवढ्या लोकसंख्येला सुविधा देण्याचे आव्हान सत्ताधारी व पालिका प्रशासनासमोर असणार आहे. नगरसेवकांची संख्या 20 पेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढीव भागातील अनेक इच्छुक आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाल्याचे आगामी काळात पाहायला मिळणार आहे.
करंजे, गोडोलीसह काेणता भाग सातारा शहराच्या हद्दीत आला जाणून घ्या
असा झाला हद्दवाढीचा प्रवास...
पालिकेत नव्याने समाविष्ट होणाऱ्या भागात पालिकेला लगेच कर घेता येणार नाही. शासनाच्या नियमानुसार तेथे सुविधा पुरवाव्या लागतात. त्यानंतर पाच वर्षांत नव्या भागात टप्प्याटप्प्याने कर वाढवले जातील. शासनाची अधिसूचना आल्यानंतर हद्दवाढीत आवश्यक असणारी प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्यात येईल.''
अभिजित बापट, मुख्याधिकारी
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.