BJP MLA Shivendraraje Bhosale  esakal
सातारा

Shivendraraje Bhosale : कोणी काहीही प्रयत्न केले, तरी दारूबंदी उठणार नाही; शिवेंद्रराजेंचा नेमका कोणाला इशारा?

जावळी तालुका हा माझ्या मतदारसंघातील दारूबंदी झालेला पहिला तालुका - शिवेंद्रसिंहराजे

सकाळ डिजिटल टीम

व्यसनाला सर्वांचा विरोधच राहणार आहे. त्यांना कोणाचा पाठिंबा मिळेल, असे मला वाटत नाही.

सातारा : सातारा-जावळी मतदारसंघातील जावळी हा राज्यात सर्वप्रथम दारूबंदी झालेला तालुका आहे. त्यामुळे कोणीही काहीही प्रयत्न केले, तरी येथील दारूबंदी (liquor Ban) उठणार नाही. त्यासाठी जे कोणी प्रयत्न करत असतील, त्यांना राजकीय व सामाजिक पाठिंबा मिळणार नाही, असं स्पष्टपणे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितलंय.

त्यांचे कोणीही समर्थन करणार नाही. येथे दारूबंदी राहिलीच पाहिजे, अशी भूमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी स्पष्ट केली आहे. जावळी तालुक्यातील मेढा परिसरात अवैध दारूधंद्यावर कारवाई होत नसल्याने, तसेच पर्यटनाला चालना मिळत नसल्याने तालुक्यात पुन्हा दारू दुकाने सुरू व्हावीत, असा सूर उमटू लागला आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजेंची भूमिका ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने जाणून घेतली. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘जावळी तालुका हा माझ्या मतदारसंघातील दारूबंदी झालेली पहिला तालुका आहे; पण आता मेढा परिसरातील काही भागांत चोरून दारूविक्री होत आहे. यावर कारवाई होत नसल्याने काही लोकांनी येथे दुकाने सुरू व्हावीत, अशी भूमिका घेतली आहे.

मुळात ही भूमिका चुकीची आहे. त्यांच्या या भूमिकेला राजकीय आणि सामाजिक पाठिंबा मिळणार नाही. खरेतर व्यसनापासून सर्वांनीच दूर राहिले पाहिजे. व्यसनाला सर्वांचा विरोधच राहणार आहे. त्यांना कोणाचा पाठिंबा मिळेल, असे मला वाटत नाही. कुणी काहीही प्रयत्न करत असेल तर त्याला राजकीय आणि सामाजिक पाठिंबा मिळणार नाही, तसेच त्यांचे कोणीही समर्थन करणार नाही. तालुक्यात दारूबंदी राहिलीच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असं शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT