Narendra Patil  esakal
सातारा

Corona काळात कामगारांचा जीव धोक्यात; नरेंद्र पाटलांची राज्यपालांकडे धाव

गेल्या वर्षीपासून लॉकडाउनच्या काळात माथाडी कामगार जीव मुठीत काम करत आहेत.

राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : माथाडी कामगार व त्यांच्याशी संलग्न अन्य घटकांचा अत्यावश्‍यक सेवेत समावेश करून त्यांना रेल्वे व बसने प्रवास करण्यास परवानगी द्यावी. तसेच त्यांना विशेष विमा संरक्षण कवच लागू करावे, या मागणीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिफारस करावी, अशी विनंती महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांना राजभवनात भेटून केली. (Narendra Patil Meet On Governor Bhagatsingh Koshyari In Mumbai Satara News)

नरेंद्र पाटील यांच्यासह युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांचा शिष्टमंडळात समावेश होता. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, "गेल्या वर्षांपासून लॉकडाउनच्या (Lockdown) काळात माथाडी कामगार व अन्य घटक जीव मुठीत घेऊन नागरिकांच्या जीवनावश्‍यक वस्तूंच्या मालाची तसेच खते, खाद्यमालाची चढ-उताराची कामे करीत आहेत.

त्यांच्या न्याय प्रश्नांची अनेक निवेदने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधिताना सादर केली. लाक्षणिक संप केला, परंतु दखल घेतली गेली नाही म्हणून राज्यपालांना भेटून निवेदन सादर केले आहे.'' एका बाजूला जीवनावश्‍यक सेवा सुरळीत ठेवण्याची भूमिका घ्यायची आणि दुसरीकडे त्यासाठी जीव धोक्‍यात घालणाऱ्यांना संरक्षण देण्यास टाळाटाळ करायची हे धोरण कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Narendra Patil Meet On Governor Bhagatsingh Koshyari In Mumbai Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT