सातारा

रूपाली चाकणकरांनी अध्यक्षपदासाठी सूचविलेल्या नावास राष्ट्रवादीतूनच विरोध; शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या निर्णयाकडे लक्ष

उमेश बांबरे

सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेस (Nationalist Congress Party) महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांतील कुरबुरी नेत्यांपर्यंत पोचल्या आहेत. त्यामुळे हे वाद निर्माण करणाऱ्या महिला पदाधिकारी बदलाचे वारे सध्या वाहत आहेत. यासाठी प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे; परंतु त्यांनी अध्यक्षपदासाठी सूचविलेल्या नावाला राष्ट्रवादीतील काही नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे महिला आघाडीतील हा वाद आता पक्षश्रेष्ठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दरबारात जाणार आहे. अध्यक्षपदासाठी ते कोणाचे नाव सूचविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
सातारा जिल्हा राष्ट्रवादीच्या महिला आघाडीत एक अध्यक्ष व दोन कार्याध्यक्ष नेमून मतदारसंघांचा समन्वय राखण्याचा प्रयत्न पक्षाकडून झालेला आहे; परंतु या तीन पदाधिकाऱ्यांचे पहिल्या दिवसांपासून कधीच जमले नाही. त्यांच्या कुरबुरी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या कानापर्यंत गेल्या. त्यामुळे गेल्या वर्षी याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे महिला आघाडीच्या पदाधिकारी बदलाव्यात, अशी मागणी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी केली होती; पण त्यानंतर मुंबईत झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी हा विषय स्थानिक पातळीवरच सोडविण्याची सूचना केलेली होती. त्यानंतरही महिला पदाधिकाऱ्यांची कुरबुरी कायम राहिल्या.

सातारा जिल्ह्यात Covid 19 ची लस संपली! दोन लाख नागरिकांचा दुसरा डोस लांबणीवर
 
जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच शासकीय विश्रामगृहात झाली. या वेळी कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चाकणकर या शासकीय विश्रामगृहात आल्या होत्या. या वेळी महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांच्या वादावर चर्चा झाली. प्रदेशाध्यक्षा चाकणकर यांनी पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. पक्षाचे नीट काम करा, केवळ खुर्चीत बसण्यासाठी पक्षात येऊ नका, नाही तर तुम्ही घरीच बसा असे ठणकावले, तसेच त्यानंतर झालेल्या नियुक्तिपत्र वाटण्याच्या कार्यक्रमात महिला पदाधिकाऱ्यांनी एकमेकींची ऊणीदुणी काढली. त्यामुळे प्रदेशाध्यक्षा चाकणकर या संतप्त झाल्या होत्या. या सर्व परिस्थितीची जिल्ह्यातील नेत्यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, लवकरच महिला आघाडीतील पदाधिकारी बदलले जाणार आहेत.

खवय्यांनो खुशखबर! साताऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांची मटण, चिकनच्या दुकानांना परवानगी 
 
तीन महिला पदाधिकाऱ्यांत असलेल्या वादामुळे इतर कोणीही महिला नेतृत्व करण्यास पुढे येण्यास तयार नाहीत. सध्या राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना महिला आघाडीचे कामकाज चांगल्या प्रकारे संभाळणारी व महिलांचे संघटन चांगले ठेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणारी महिला कार्यकर्ती हवी आहे. त्याचा शोध सध्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते घेत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत महिला आघाडीत पदाधिकारी बदलाचे वारे वाहणार आहेत. 

शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या निर्णयाकडे लक्ष 

दरम्यान, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चाकणकर यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी एका महिला पदाधिकाऱ्याचे नाव सूचविले आहे; परंतु त्या नावाला जिल्ह्यातील काही नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे महिला आघाडीतील हा वाद आता पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यापुढे जाणार असून, ते अध्यक्षपदासाठी कोणाचे नाव सूचविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रामदास आठवलेंच्या Go Corona, Corona Go..ला उदयनराजेंचे खास समर्थन; शरद पवारांच्या भेटीचेही उलगडले सत्य

Edited By : Siddharth Latkar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT