Karad-Shedgewadi Road Accident esakal
सातारा

Road Accident : देवदर्शन करुन परतताना कारचा अपघात; नवी मुंबईतील महिला ठार, पाच जण गंभीर जखमी

सकाळ डिजिटल टीम

नवी मुंबईतील संतोष मोरे हे पत्नी जयश्री यांच्यासह इतरांसोबत कारने गुरुपौर्णिमेनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथे देवदर्शनासाठी गेले होते.

कऱ्हाड : देवदर्शनाहून परतताना कऱ्हाड-शेडगेवाडी रस्त्यावरील ओंड येथे चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार रस्त्याकडेच्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात (Road Accident) एक महिलेचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाले. काल पहाटे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. जयश्री संतोष मोरे (वय ४२, रा. होम समर्थ सोसायटी, सानपाडा, सेक्टर पाच, नवी मुंबई) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

तर संतोष शंकर मोरे (रा. सानपाडा, सेक्टर पाच, नवी मुंबई), विकास वसंत भोसले (रा. भांडूप, मुंबई), शैला संजय कदम, माधुरी लोंढे (दोघीही रा. कुर्ला, मुंबई) व गिरीश सूर्यकांत गुहागरकर (रा. विक्रोळी, मुंबई) हे जखमी झाले आहेत. दरम्यान, याबाबत संतोष मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक गिरीश गुहागरकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील संतोष मोरे हे पत्नी जयश्री यांच्यासह इतरांसोबत कारने गुरुपौर्णिमेनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथील कार्यक्रम झाल्यानंतर ते सर्वजण रात्री पुन्हा मुंबईला जाण्यासाठी शेडगेवाडी ते कऱ्हाड मार्गाने कऱ्हाडकडे येत होते. गिरीश गुहागरकर हा कार चालवीत होता.

काल पहाटे सहाच्या सुमारास ओंड गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्याच्या उजव्या बाजूस जाऊन रस्त्यानजीकच्या खड्ड्यात पलटी झाली. त्यामध्ये सर्वजण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच जयश्री मोरे यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT