Navratri 2024  
सातारा

Navratri 2024 : उभ्याच्या नवरात्राने जगदंबेचा जागर...वाई तालुक्यातील पांडे गावची प्रथा; विजयादशमीला सोडणार उपवास

Navratri 2024 : वाई तालुक्यातील पांडे गावात साडेतीनशे वर्षांपासून उभ्याचे नवरात्र पाळले जाते. नवसकरी घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत उभे राहून नवस पूर्ण करतात, अशी परंपरा आहे.

सकाळ वृत्तसेवा

कवठे : वाई तालुक्यातील पांडे गावचे उभ्याचे नवरात्र ही परंपरा सुमारे साडेतीनशे वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे. नवरात्रामध्ये जे लोक नवस बोलतात, ते नवसकरी घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत उभे राहून नवस पूर्ण करतात. या अनोख्या उपवासाने ‘मनी धरावे ते होते,’ अशी या गावातील, तसेच परिसरातील लोकांची धारणा आहे.

पुणे- बंगळूर महामार्गापासून चार किलोमीटर अंतरावरील पांडे गावात साडेतीनशे उंबरठा व सुमारे अडीच हजार लोकसंख्या आहे. गावचे ग्रामदैवत भैरवनाथ आहे. गावात हिंदू-मुस्लिम समाजाबरोबरच इतर समाजातील सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात. नवरात्रात घटस्थापनेपासून नवमीपर्यंत गावातील जवळपास पंच्याहत्तर टक्के लोक कडक उपवास करतात.

काळभैरवनाथाला ज्यांनी नवस केला आहे, असे लोक उभ्याचे नवरात्र पाळतात. या नऊ दिवसांत नवसकऱ्यांनी पायात पादत्राणे न घालता जमिनीवरच पाय ठेवून सर्व दिनचर्या उभ्याने करावयाची असते. नवसकऱ्यांनी गावची शिव ओलांडायची नसते. झोप आल्यास दोरीने टांगलेल्या झोपाळ्यावर छातीपर्यंतचा भाग टेकवून डुलकी घेताना मात्र एक पाय जमिनीवरच ठेवावा लागतो. यासाठी भैरवनाथ व विठ्ठल या मंदिरात झोपाळे बांधण्यात येतात. दुपारच्या वेळी घरी फराळासाठी गेले, तरी फराळ उभ्यानेच करायचा. मात्र, मुक्कामाला मंदिरात यायचे, अशी शिस्त आहे.

मंदिरात बांधलेल्या झोपाळ्यावरच नवसकरी रात्रीची विश्रांती घेतात. व्रताच्या स्मरणासाठी व आधारासाठी नवसकरी काठीचा आधार घेतात, अशी व्रताची कडक सर्व बंधने आहेत.शुद्ध प्रतिपदेला सकाळी पहाटे आंघोळ करून गावातील सर्व ग्रामस्थ देवांचे दर्शन घेऊन, भैरवनाथाच्या पालखीसमवेत सलग नऊ दिवस गावाला प्रदक्षिणा घालतात.

धुपारती केल्यानंतर घटस्थापना करण्यात येते. सर्व देवदेवतांची छबिना व पालखी मिरवणूक काढण्यात येते. धुपारतीनंतर अकरा वाजता फराळ घेऊन सर्व जण विश्रांती घेतात. यानंतर ढोल-ताशे व शिंग- नवसकरी व महिला दररोज तुतारीच्या निनादात भैरवनाथाच्या मंदिरात येतात. यानंतर व्रतास सुरुवात होते. फराळात फळे व तिखट-मीठ एकत्र नसलेल्या पदार्थांचा समावेश असतो.

या उत्सव कालावधीत रात्री भजन, कीर्तन, गोंधळ, वाघ्या मुरळी असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतात. अष्टमीला देवाचा जागर होतो. यावेळी पेढे, मिठाई विक्रेते दुकाने मांडतात. प्रत्येक नवसकरी पेढे वाटतात.

पहाटे देवाची वाद्याच्या गजरात वाजत-गाजत पालखी निघते. नवमीच्या दिवशी देवापुढे कौल लावून पुढील नवस बोलले जातात. विजयादशमीला देवापुढे कौल लावून सीमोल्लंघनाची दिशा ठरविली जाते. नंतर त्या दिशेकडील गावच्या हद्दीवर जाऊन भाविक सोने लुटतात. या वेळी गावातील आबालवृद्ध, महिला व सर्व जातीधर्मातील लोक या उत्सवात सहभागी होतात. प्रत्येक कुटुंबातील किमान एक सदस्य, तसेच बाहेर गावातील पै-पाहुणे या व्रतात मनोभावे सहभागी होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT