Shashikant Shinde esakal
सातारा

बस्स झालं! आता पोपटपंची बंद करा; NCP ची सेनेच्या आमदारावर सडकून टीका

राजेंद्र वाघ

आमदार महेश शिंदेंनी आमदार शशीकांत शिंदेंवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

कोरेगाव (सातारा) : कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील (Koregaon Assembly constituency) विद्यमान आमदारांनी स्वकर्तृत्वावर कामे मंजूर न करता आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी प्रयत्न करुन मंजूर केलेल्या कामांची उद्घाटने, भूमीपूजने व कृतज्ञता सोहळे घेण्यातच धन्यता मानलीय. नुकतेच जिहे-कठापूर योजनेचेही (Jihe-Kathapur scheme) श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोपटपंची करुन दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये. खटाव तालुक्यातील जनता त्यांच्या या भूलथापांना बळी पडणारी नाही, असा टोला प्रदीप गोडसे, डॉ. महेश पवार, अरुण वाघ यांनी आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांना लगावला.

महेश शिंदे यांनी आमदार शशीकांत शिंदेंवर केलेल्या टीकेला खटाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी प्रतिउत्तर दिले आहे. यासंदर्भात प्रदीप गोडसे, डॉ. महेश पवार, अरुण वाघ यांनी म्हटले, की खटाव तालुक्यातील मोळ म्हस्कोबा मंदिर वस्ती मोळ रस्ता दोन कोटी ४२ लाख, तसेच गारवडी ते पशुचामळा डिस्कळ रस्ता ७१.१० लाख, रा. मा. १४१ ते लांबी १.०२० किमी ७४.३६ लाख अशी एकूण तीन कोटी ८७ लाखांच्या कामांची मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी १४ ऑगस्ट २०१८ मध्ये केली होती. या प्रस्तावित कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना २०१९-२० मधून मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. या कामांना सात जून २०१९ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या आमदारकीचा जन्म सुध्दा झाला नव्हता.

खटाव तालुक्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी कोट्यवधींची विकासकामे केली आहेत. विद्यमान आमदारांनी गेल्या दोन वर्षांपासून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील उर्वरित कामे का मंजूर केली नाहीत, असा प्रश्न करून त्यांनी पोपटपंची करुन दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये. खटाव तालुक्यातील जनता त्यांच्या या भूलथापांना बळी पडणारी नाही. लवकरच आमदार शशिकांत शिंदेंच्या हस्ते या रस्त्यांच्या कामांचे भूमीपूजन करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT