Khandala Nagar Panchayat election 2021 esakal
सातारा

बुरुज अबाधित ठेवून प्रतिष्ठेचा गड जिंकणं NCP, BJP, काँग्रेसमोर मोठं आव्हान

अशपाक पटेल

आपला बुरुज अबाधित ठेवून प्रतिष्ठेचा गड जिंकणं हे सर्व पक्षांसमोर मोठं आव्हान असणार आहे.

खंडाळा (सातारा) : आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांनी आपल्या वार्इ विधानसभा मतदारसंघावर (Wai Assembly Constituency) ठेवलेली मजबूत पकड ही येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसला (Nationalist Congress Party) पोषक असून, खंडाळा साखर कारखान्यात (Khandala Sugar Factory) पराभव पत्कारायला लागल्याने भारतीय जनता पक्षप्रणित (Bharatiya Janata Party) गाढवे गटासाठी येथील नगरपंचायत निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची, आव्हानात्मक ठरणार आहे. येथे राष्ट्रवादी व भाजप अशीच दुरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.

गत पंचवार्षिकमध्ये दोन्ही परस्पर विरोधी गटांनी या ना त्या कारणाने सत्ता भोगली. मात्र, विकासकामांवर म्हणावा तसा जोर न देता कुरघोडी करणे व सत्ता अबाधित ठेवाण्यासाठीच प्रयत्न झाले. महाविकास आघाडी झाली तरी आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार असून, भाजपकडून ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे व अनिरुध्द गाढवे यांच्या नेतृत्वाखाली हा गट कार्यरत राहणार आहे. तालुक्यात झालेल्या सर्व निवडणुका पाहता आमदार गटाने आपला गड मजबूत ठेवला आहे, तर गाढवे गटासाठी आपला बुरुज अबाधित ठेवून प्रतिष्ठेचा गड जिंकणे हे मोठे आव्हान असणार आहे.

खंडाळ्यात १७ प्रभाग आहेत. जुने गावठाण व नवीन शहरीकरण असे दोन भाग पडलेले आहेत. जुन्या गावठाणात गाढवे गट अधिक क्रियाशील, तर नवीन वसाहतीत आमदार गटाचे वर्चस्व पाहायला मिळते. मात्र, प्रत्येक निवडणुकीत विरोधी गटातील मोहरे आपल्याकडे वळविण्यात आमदार पाटील यांचा हातखंडा सर्वश्रुत असल्याने गाढवे गटाला आपली पूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे. गाढवे गटाने मात्र येथे ग्रामपंचायत असताना खंडाळा शहरावर ठेवलेले वर्चस्व व मोठ्या शैक्षणिक संकुलामध्ये स्थानिक मंडळींना रोजगार उपलब्ध करून दिल्याचा फायदा या गटाला होऊ शकतो. जिल्हा बँक (Satara District Bank Election) व खंडाळा साखर कारखाना निवडणुकीमध्ये आमदार पाटील यांनी एकहाती मिळवलेली सत्ता ही खंडाळा राष्ट्रवादीसाठी मोठी जमेची बाजू ठरणार आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीला नऊ तर तत्कालीन काँग्रेस व सध्या भाजपत असणाऱ्या गटाला सात व एक अपक्ष असे बलाबल होते. त्यात सत्ताबदल किंवा राजकीय उलथापालथ झाली तरी शेवटपर्यंत विषय समित्या निवडता आल्या नसल्याचाही फटका येथील सत्ताधाऱ्यांना बसू शकतो.

महाविकास आघाडीचीही शक्यता

काँग्रेस (Congress) स्वबळावर लढणार असल्याचे तालुकाध्यक्ष एस. वाय. पवार यांनी सांगितले असले तरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी लोणंदला भेट देताना खंडाळ्याकडे पाठ फिरवल्याचीही चर्चा सुरू आहे. शनिवारी दुपारी महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादीने काँग्रेसपढे मैत्रीचा हात पुढे केला. शनिवारी याबाबत बोलावलेली बैठक पुढे ढकलली असली तरी राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्र निवडणुकीला सामोरे जातील, असे सांगण्यात येत आहे. शिवसेनेने मागील निवडणुकीत दोन जागा लढवूनही यश पदरी पडले नव्हते. तरीही राजकीय आखाड्यात उतरणार असल्याचे शनिवारी झालेल्या कोपरा बैठकीत जाहीर केले. मात्र, आघाडी झाली तर शिवसेना त्यात सहभागी होईल, असे दिसते आहे. रिपब्लिकन पक्षाची सोमवारी बैठक होणार असून, किमान चार जागा लढवण्याचा त्यांचा निर्धार आहे. अशा प्रकारे मोर्चेंबांधणी सुरू असली तरी दुरंगी लढतच येथे होण्याची चिन्हे दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT