सातारा : आपण काेणाबद्दल बाेलताे हे बाेलणा-यास समजले पाहिजे. एखाद्या थाेरा मोठ्या व्यक्तीवर टीका करून जनतेसह अन्य सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी आक्रस्थाळीपणाची विधाने गोपीचंद पडळकर यांच्याकडून केली जात आहेत. स्थानिक लोकांनी निर्णय घेऊन कार्यक्रमाचे नियोजन केले होते. तेथे जाऊन ते थांबवणे हा पोरकटपणाच म्हणावा लागेल. राजकारणात किती खालच्या थराला जायचे, याचा हा एक नमुना आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना फटकारले.
सातारा शासकीय विश्रामगृहात शनिवारी रात्री उशिरा मंत्री पाटील आले होते. त्यावेळी वाई, खंडाळा, महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, अविनाश मोहिते, "राष्ट्रवादी युवक'चे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, अतुल शिंदे, सारंग पाटील, सत्यजितसिंह पाटणकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दरम्यान दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर पाटील म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्यांची चूक हळूहळू लक्षात येऊ लागली आहे. पंतप्रधानांनी हट्ट करणे बरोबर नाही. चार पावले मागे येऊन शेतकऱ्यांशी विश्वासाने चर्चा केली असती तर हे आंदोलन थांबले असते.'' या वेळी श्री. पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली. राजकारणात किती खालच्या थराला जायचे, याचा हा एक नमुना आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
राष्ट्रवादींतर्गत बंडाळी उफाळली? मकरंद पाटलांच्या भूमिकेकडे खिळून राहिल्यात नजरा
साऊथ इंडियन पद्धतीने बनवा बैंगन करी, चव चाखाल तर पुन्हा मागाल
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.