Karad municipal Election esakal
सातारा

पालिका निवडणुकीतही पाटील-भोसले गट एकत्र?

सकाळ डिजिटल टीम

भाजपसह काँग्रेसनेही स्वबळाचा नारा दिला असला तरी दोन्ही पक्ष अजून त्यावर ठाम नाहीत.

कऱ्हाड (सातारा) : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Satara District Bank Election) पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) व भाजपचे अतुल भोसले (Atul Bhosle) यांच्या एकत्रीकरणाचा करिष्मा दिसला. तोच करिष्मा पालिकेच्या राजकारणातही नव्या समीकरणाला जन्म देणारा ठरण्याची शक्यता आहे. पालकमंत्री पाटील यांनी अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Udaysingh Patil-Undalkar) यांच्या केलेल्या पराभवामुळे पाटील-भोसले गट चार्ज झाला आहे. आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या गटालाही पालिकेच्या निवडणुका आव्हानात्मक ठरणार आहेत. त्यात जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव (Rajendra Yadav) आणि उपाध्यक्ष जयवंत पाटील (Jaywant Patil) यांच्या भूमिकांकडे लक्ष लागून आहे.

पालिकेचे राजकारण स्थानिक आघाड्यांभोवती फिरते. भाजपसह (BJP) काँग्रेसनेही (Congress) स्वबळाचा नारा दिला असला तरी दोन्ही पक्ष अजून त्यावर ठाम नाहीत. त्यातच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठी राजकीय घुसळण झाली. पक्षविरहित झालेल्या जिल्हा बँकेच्या कऱ्हाड सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते अॅड. पाटील- उंडाळकर यांचा झालेला पराभव काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह गटातील प्रत्येकाने मेहनत घेत केलेली राजकीय जुळणी यशस्वी झाल्याने विजयश्री मिळाली. या निवडणुकीत पालकमंत्री गटाने भोसले गटाशी हातमिळवणी केली. तीच आघाडी पालिकेच्या निवडणुकीतही कायम ठेऊन पृथ्वीराज चव्हाणांभोवती चक्रव्यूह आखण्याची रणनीती सुरू आहे.

अतुल भोसले व लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील यांचे संबंध सर्वश्रूत आहे. लोकशाही आघाडीचे नेते सुभाष पाटील यांनीही विजयाच्या जुळणीत बेरजेचे राजकारण केले. त्याचाही पालिकेच्या निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे. पाटील-भोसले गटाची मनोमिलन एक्स्‍प्रेस सुसाट असल्याने कार्यकर्तेही चार्ज आहेत. हेच समीकरण पालिकेत राहावे, यासाठी कार्यकर्त्यांतून आग्रह वाढत आहे. या समीकरणात माजी उपाध्यक्ष, जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव यांची एन्ट्री होणार का, याची उत्सुकता आहे. लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांचा यादव गटाचा पालिकेत चांगलाच सूर जुळला आहे. त्यामुळे एकत्रीकरणाची शक्यता आहे. उपाध्यक्ष जयवंत पाटील यांची भूमिकाही अत्यंत महत्त्‍वाची आहे. जयवंत पाटील हे पालकमंत्री पाटील यांच्या निकटचे आहेत. तसाच त्यांचा अतुल भोसले यांच्यासोबतही घरोबा आहे. जिल्हा बँक निवडणुकीतही ते याच दोघांसोबतच होते. त्यामुळे जयवंत पाटीलही पाटील-भोसले गटाच्या आघाडीत असतील, अशी चर्चा आहे. तेही लवकरच स्पष्ट होईल.

भाजप-काँग्रेसच्या समीकरणाची चर्चा

पालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या भोसले गटाने वेगळा विचार केल्यास उर्वरित भाजपही अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यात जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या निर्णयाकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. त्यामुळे भाजप-काँग्रेसच्या समीकरणालाही चालना देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्या समीकरणालाही गती मिळेल, अशी स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मानखुर्द विधानसभेत नवाब मलिक पिछाडीवर, अबू आझमी आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT