Udayanraje Bhosale esakal
सातारा

ठरलं! उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादी देणार तगडा उमेदवार

सकाळ डिजिटल टीम

'गृहनिर्माण' मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी आहे.

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election) राष्ट्रवादीच्या (NCP) सर्वसमावेश पॅनेलमधील उमेदवारांची यादी अद्याप निश्चित झालेली नाही. यातील काही अडचणीच्या मतदारसंघांबाबत खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवारच निर्णय घेणार आहेत. त्यानंतर सात नोव्हेंबरला याबाबत महत्त्वपूर्ण बैठक होऊन यामध्ये राष्ट्रवादीच्या पॅनेलचे (Nationalist Panel) अंतिम चित्र ठरणार आहे. दरम्यान, सर्वच मतदारसंघात अनेक इच्छुकांचे अर्ज दाखल झाल्याने पॅनेलचा उमेदवार अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उर्वरितांचे अर्ज मागे घेण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू केले आहेत.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची शेवटची बैठक आज बँकेत झाली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक अध्यक्षांच्या चेंबरमध्ये झाली. बैठकीस विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale), उपाध्यक्ष सुनील माने, संचालक नितीन पाटील आदी उपस्थित होते. या वेळी झालेल्या चर्चेत दिवाळीनंतरच सर्वसमावेश पॅनेलमधील उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. त्यासाठी सात नोव्हेंबरला महत्त्वपूर्ण बैठक होईल. त्यामध्ये उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. सध्या अर्ज मागे घेण्याचा कालावधी असून, पक्षाकडून कोणाला अर्ज मागे घेण्यास सांगू शकतो, याबाबतही चर्चा झाली.

बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोणत्या तालुक्यात किती मतदान आहे, कोणत्या मतदारसंघात आपल्याला सर्वाधिक लक्ष केंद्रित करावे लागेल, याचा आढावा पालकमंत्री पाटील आणि सभापती रामराजे निंबाळकर यांनी घेतला. त्यानुसार कार्यरत राहावे लागेल, असे ठरविण्यात आले. काही सोसायटी मतदारसंघात मतदारांची पळवापळवी होऊ शकते, यावर लक्ष ठेवण्याचा निर्णय झाला. राखीव प्रवर्गातून कोण उमेदवार असेल, यावर चर्चा सुरू आहे. यातील उमेदवारही जवळपास निश्चित झाले असले, तरी त्यामध्ये ऐन वेळी काही बदल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (MP Ranjitsingh Naik-Nimbalkar), आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) या दोघांनी भाजप सर्वसमावेशक पॅनेलमध्ये कोण कोण सहभागी होऊ शकते, याची चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी ते दोघे कोरेगाव, खटाव आणि कऱ्हाड तालुक्यात राष्ट्रवादी, तसेच काँग्रेसच्या काही नेत्यांशी व मतदारांशीही संपर्क करून आहेत.

उदयनराजेंविरोधात उमेदवार कोण...

गृहनिर्माण व दुग्ध प्रक्रिया संस्था मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांची उमेदवारी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वपक्षीय पॅनेलचा त्यांच्या विरोधातील उमेदवार कोण, याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादीच्या सर्वसमावेश पॅनेलकडून येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे बंधू जयवंत पाटील, नामदेव सावंत, दादासाहेब बडदरे, दिलीपसिंह भोसले, ज्ञानेश्वर पवार यांचे अर्ज आहेत. यापैकी उदयनराजेंच्या विरोधात कोणाला उतरविणार याविषयी बैठकीत चर्चा झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT