NDRF Team esakal
सातारा

पुण्यातून कऱ्हाडला आलेली 'NDRF'ची दोन पथके आंबेघर, मिरगावला रवाना

हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाड शहरासह तालुक्यात (Flood in Karad Taluka) पूरसदृश्य स्थितीत मदतीसाठी पुण्याहून येथे एनडीआरएफचे पथक (NDRF Team) येथे दाखल झाले आहे. दरम्यान, पाटण तालुक्यातील आंबेघर व मिरगावला भुस्खलन झाल्याने संबंधित पथकाला तेथे मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. कऱ्हाडचे तहसीलदार अमरदीप वाकडे हे एनडीआरएफच्या दोन टीम घेवून पाटण तालुक्यातील संबंधित ठिकाणी रवाना झाले आहेत. (NDRF Team From Karad Has Been Sent To Ambeghar And Mirgaon In Patan Taluka For Help bam92)

कऱ्हाड शहरासह तालुक्यात पूरसदृश्य स्थितीत मदतीसाठी पुण्याहून एनडीआरएफचे पथक कऱ्हाडात दाखल झाले आहे.

मुसळधार पावसामुळे (Heavy Rain In Karad) कृष्णा-कोयना नद्यांसह (Koyna and Krishna River) उपनद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. अनेक नद्या व उपनद्यांचे पाणी पात्राबाहेर येऊन नागरी वस्तीत घुसू लागले आहे. नदीकाठच्या गावांमध्ये ही पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे. सध्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. मात्र, कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्या पार्श्वभूमीवर तातडीने मदत उपलब्ध व्हावी, यासाठी प्रशासनाकडून कऱ्हाडला एनडीआरएफची टीम दाखल करण्यात आली होती. मात्र, पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगावला भुस्खलन झाले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार संबंधित पथक हे तिकडे मदतीसाठी पाठवण्यात आले आहे. कऱ्हाडचे तहसीलदार वाकडे, मंडल अधिकारी, तलाठी हे संबंधित पथकाला घेवून संबंधित ठिकाणी मदतकार्यासाठी रवाना झाले आहेत.

NDRF Team From Karad Has Been Sent To Ambeghar And Mirgaon In Patan Taluka For Help bam92

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024: मुंबईत कॅश व्हॅनमध्ये सापडल्या साहेसहा टन चांदीच्या विटा

IND vs SA: दुसऱ्या सामन्यात येणार पावसाची आडकाठी, वाचा काय आहेत हवामान अंदाज

Sholay : सचिन यांनी असं वाचवलं शोलेमधील गब्बरचं करिअर ; हा भन्नाट किस्सा जरूर वाचा

Dev Uthani Ekadashi 2024: देव उठनी एकादशीला चुकूनही करू 'या' गोष्टी, माता लक्ष्मीचा होईल नाराज

AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात वन डे मालिका जिंकली, Mohammad Rizwan ची विराटशी बरोबरी

SCROLL FOR NEXT