Bhambavli Vajrai Waterfall esakal
सातारा

Bhambavli Waterfall : देशातील सर्वांत उंच धबधबा असलेल्या भांबवली-वजराई धबधब्याच्या 'सेल्फी पॉइंट'ने पर्यटकांचे वेधले लक्ष

सकाळ डिजिटल टीम

उपवनसंरक्षकांनी सूचना केल्याप्रमाणे सर्व सोपस्कार पूर्ण करून एका महिन्यात सेल्फी पॉइंट तयार झाला.

कास : देशातील सर्वांत उंच धबधबा असलेल्या भांबवली वजराई धबधब्याच्या (Bhambavli Vajrai Waterfall) सेल्फी पॉइंटने पर्यटकांचे (Tourists) स्वागत होत असून, हा नवीन सेल्फी पॉइंटमुळे (Selfie Point) भांबवलीच्या सौंदर्यात भर पडली आहे. उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांनी भांबवली वजराई धबधब्याला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी नियोजित कामांच्या जागेची पाहणी केली. त्याप्रमाणे प्रस्ताव बनविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.

धबधब्याकडे जाताना गावात पुरातन काळ्या दगडाचा हौद पाहून त्यांनी या हौदाला सेल्फी पॉइंट बनवण्याचे ठरविले. त्या वेळी उपस्थित ग्रामस्थांनी तत्काळ होकार दिला. उपवनसंरक्षकांनी सूचना केल्याप्रमाणे सर्व सोपस्कार पूर्ण करून एका महिन्यात सेल्फी पॉइंट तयार झाला.

हॅशटॅग पंधरा दिवसांत तयार करून मिळाले व इतर सोपस्कारही पूर्ण केले. सरकारी काम एका महिन्यात पूर्ण झाले, हे पाहून ग्रामस्थ अचंबित झाले. पर्यटकांचे भांबवली वजराई धबधब्यावर हॅशटॅगमुळे स्वागत होत असून, पर्यटकांनी फोटोच्या माध्यमातून आठवण जपून ठेवावी, असे आवाहन रवींद्र मोरे यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे धबधबा काही दिवस बंद ठेवण्यात आला होता; परंतु धबधबा पुन्हा सुरू झाला असून, पर्यटकांनी धबधब्याला भेट द्यावी व निसर्ग पर्यटनाचा आस्वाद घ्यावा, असे संयुक्त वन व्यवस्थापन समिती भांबवली यांनी आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satyapal Malik: "अंबानींची फाईल माझ्याकडं सहीसाठी आली होती, पण..."; सत्यपाल मलिकांचा खळबळजनक खुलासा

...नाहीतर हातपाय तोडू, पाकिस्तानी चित्रपट 'द लिजेंड ऑफ मौला जट' विरोधात MNS आक्रमक, थेट धमकीच दिली

Dharavi Mosque: धारावी मशीद प्रकरण; बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी समितीला 8 दिवसांची मुदत, अन्यथा...

Zero to hero! शुभमन गिलने भारी पराक्रम नोंदवला, आपला Rishabh Pant ही विक्रमाच्या बाबतीत मागे नाही राहिला

Mumbai University Senate Election : उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच होणार

SCROLL FOR NEXT