सातारा

Video : काय सांगता...बायकोसाठी नवऱ्याने दिली बारावीची परीक्षा अन् दोघांना मिळाले सेम टू सेम मार्क

विलास माने

मल्हारपेठ (जि.सातारा) : नवविवाहित दांपत्याने बारावीची परीक्षा दिली. विशेष म्हणजे या दांपत्याला समान गुण मिळाल्याने दुर्गम गणेवाडीसह पाटण तालुक्‍यात त्यांचे कौतुक होत आहे. गणेवाडी येथील एका दांपत्यास इयत्ता बारावीच्या परीक्षेत कला आणि वाणिज्य विभागात एकसारखे मार्क्‍स मिळाल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेत नाेकरीची संधी 

गुरुवारी (ता.16) जाहीर झालेल्या निकालात पठारावरील दुर्गम गणेवाडी येथील अधिक कदम आणि किरण सूर्यवंशी या नवदांपत्याने बारावीची परीक्षा दिली होती. पत्नीचा शिक्षणाचा उत्साह वाढावा, म्हणून पतीनेही बारावीची परीक्षा देण्याचा निश्‍चय केला. परीक्षेनंतर पत्नीचे वय कमी असताना वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच या जोडप्याने 14 मे रोजी अत्यंत साधेपणाने विवाह साजरा केला.

ये हुई ना बात...सातारा जिल्ह्याच्या बारावीच्या निकालात सहा टक्यांनी वाढ

अधिक हा मल्हारपेठ येथील श्री संत तुकाराम ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी, तर किरण ही पाटण येथील बापूजी साळुंखे कॉलेजची विद्यार्थिनी होती. एका कॉलेजला पती, तर अन्य कॉलेजला पत्नी तरीही निकालानंतर दोघांनाही गुण एकसारखे मिळाले. या कदम दांपत्याना 650 पैकी 323 गुण मिळाले. त्यांच्या या यशाने दुर्गम गणेवाडी आनंदून गेली आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या मित्र परिवारासह पाटण तालुक्यात या दांपत्याला मिळालेल्या समान गुणांची खुमासदार चर्चा सुरू असून अभिनंदनाचा वर्षाव हाेत आहे.

अधिक कदम म्हणाला, ""आमचा बारावीचा निकाल आम्हा दोघांना यापुढील जीवनात नक्कीच प्रेरणादायी ठरेल. पत्नीची साखरपुड्यानंतर परीक्षा देण्याची तयारी नसताना मी परीक्षेला बसण्यासाठी प्रोत्साहित केले. मीही पुन्हा परीक्षा द्यायला बसलो. एकाच घरात आणि ते देखील नवरा बायकोचा निकाल असा कसा लागला असेल याबाबत आम्हालाही आश्‍चर्य वाटत आहे. विवाहानंतरही एकसारखी मार्क्‍स पाहून इथेही आमची मन जुळवून देवाने आम्हाला एक केले. मने एवढी तंतोतंत जुळतील यावर आमचा विश्वासाच बसत नाही. यापुढेही आम्ही पुढील शिक्षण घेण्यासाठी उत्साहित झालो आहोत.''

संपादन - सिद्धार्थ लाटकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Supreme Court : तुमच्याकडे कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनेकांना होणार फायदा

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

SCROLL FOR NEXT