Baba Maharaj Satarkar Passed Away esakal
सातारा

Baba Maharaj Satarkar : ..अन्‌ निळकंठ गोरेंचे 'असे' झाले बाबामहाराज सातारकर; 'या' पुरस्कारानं मिळवून दिली वेगळी ओळख

बाबामहाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar Passed Away) यांचे काल (गुरुवार) निधन झाले.

सकाळ डिजिटल टीम

लहानपणापासूनच त्यांना भजन कीर्तनाची आवड होती. पुढे त्यातच त्यांनी पूर्ण आयुष्य वाहून घेतले.

सातारा : बाबामहाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar Passed Away) यांचे काल (गुरुवार) निधन झाले अन्‌ संपूर्ण सातारा हळहळून गेला. त्यांच्याविषयी स्नेह असणारे, त्यांच्या कीर्तनाने मंत्रमुग्ध होणाऱ्या सातारकरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाबामहाराज सातारकर यांचे मूळ नाव निळकंठ ज्ञानेश्‍वर गोरे . मात्र, त्यांचे साताऱ्याविषयी अलोट प्रेम होते.

म्हणूनच त्यांनी आपल्या नावापुढे सातारकर हे नाव आपल्या नावाशी कायम जोडले. वारकरी संप्रदायातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन सातारकरांनी त्यांना सातारा भूषण पुरस्काराने (Satara Bhushan Award) गौरविले होते. ओजस्वी भाषा आणि अत्यंत प्रवाही शैलीतील त्यांचे कीर्तन विठ्ठल दर्शनाची अनुभूती देऊन जात होते, अशा शब्दांत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शूरांच्या पराक्रमाबरोबरच वारकरी संप्रदायाची पताका सतत फडकत ठेवणारी सातारा ही संतांचीही भूमी आहे. वारकरी संप्रदायासह सर्वत्र आदराने नाव घेतले जाणारे बाबामहाराज सातारकर यांचा जन्म साताऱ्यातील करंजे येथे वारकरी कुटुंबात झाला. ईश्वरभक्तीचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते. येथील बुधवार पेठेत त्यांचे घर आणि करंजे येथील मठ म्हणजे वारकरी संप्रदायाचे माहेरघर आहे.

दादामहाराज आणि नानामहाराज हे त्यांचे सख्खे, चुलत आजोबा. बाबांचे सारे कुटुंबच विठ्ठलभक्तीत कायम लीन होत. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जाते. बाबामहाराजांनी इंग्रजी माध्यमातून एसएससीपर्यंतचे शिक्षण घेतले. वयाच्या आठव्या वर्षापासून ते श्री सद्‌गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षापासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.

लहानपणापासूनच त्यांना भजन कीर्तनाची आवड होती. पुढे त्यातच त्यांनी पूर्ण आयुष्य वाहून घेतले. दादामहाराज सातारकर दिंडीतून बाबामहाराज यांच्या समवेत २२ वर्षे वारी करणाऱ्या शारदाबाई फरांदे म्हणाल्या, ‘‘बाबामहाराज सातारला यायचे तेव्हा आवर्जून ते बुधवारपेठेतील घरी यायचे. मठातील मारुतीचे दर्शन घ्यायचे. ते आलेले कळताच वारकरी संप्रदायातील लोक आवर्जून त्यांचे आशीर्वाद घ्यायला यायचे. ते खूप अभ्यासू होते. साताऱ्यावर त्यांचे खूप प्रेम होते. म्हणूनच त्यांनी अखेरपर्यंत सातारकर हेच नाव आडनावासारखे पुढे नेले.’’

Baba Maharaj Satarkar

माजी नगरसेविका आणि भैरवनाथ भजनी मंडळाच्या अध्यक्षा शैलजा किर्दत या बाबामहाराजांच्या निस्सीम भक्त. बाबामहाराज यांचे कीर्तन साताऱ्यात कोठेही असले, की त्या आवर्जून तेथे हजेरी लावत. त्या म्हणाल्या, ‘‘पितृपक्ष पंधरवडा संपला, की पंढरपुरात नेहमी बाबामहाराज यांचे कीर्तन असते. त्यांचे कीर्तन ऐकायला मिळेल म्हणून आम्ही यावर्षीही गेलो होतो; पण यावर्षी ते आजारी होते, त्यामुळे त्यांचे कीर्तन झाले नाही; पण बाबामहाराज म्हणजे भक्तीचा झरा होता. त्यांचे ओजस्वी भाषेतील आणि अत्यंत प्रवाही शैलीतील त्यांचे कीर्तन विठ्ठल दर्शनाची अनुभूती देऊन जात होते.’’

येथील करसल्लागार अरुण गोडबोले हे बाबामहाराजांचे निकटचे होते. रा. ना. गोडबोले ट्रस्टच्या वतीने समस्त सातारकरांमार्फत सातारा भूषण पुरस्कार देऊन बाबामहाराज यांना त्यांनी गौरविले होते. अरुण गोडबोले बाबामहाराजांविषयी म्हणाले, ‘‘बाबा महाराज हे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे कीर्तन ऐकतच राहावे, असे वाटायचे. संत परंपरा, विचार, तत्त्वज्ञान ते कायम आचरणात आणत होते. ते कीर्तनकार होते; पण ते विनोदीही होते. हाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT