satara sakal
सातारा

शाळांत खिचडीऐवजी आता पोषक स्लाइस

शालेय शिक्षण विभागाचे स्वागत; स्वयंपाकी महिलांमध्ये मात्र नाराजी

संजय जगताप - सकाळ वृत्तसेवा

मायणी : शालेय पोषण आहारातील खिचडी इतिहासजमा होणार असून, त्याऐवजी आता विद्यार्थ्यांना पोषणमूल्ये असणाऱ्या स्लाइस मिळणार आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयाचे शाळा प्रशासनाने स्वागत केले आहे. तर खिचडी बनविणाऱ्या महिलांच्या रोजगारावर गदा येणार असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्यादृष्टीने तसेच विद्यार्थ्यांच्या पटनोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनाने सन १९९५-९६ पासून मध्यान भोजन अर्थात शालेय पोषण आहार योजना सुरू केली. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ती लागू करण्यात आली. प्रारंभी विद्यार्थ्यांना केवळ तांदूळ वितरित करण्यात येत होता. मात्र, त्याचा गैरवापर होऊ लागल्याने शाळेतच खिचडी तयार करून वाटण्यात येऊ लागली. आठवडाभरात वरण-भात, डाळ तांदळाची खिचडी, मटकी, वाटाणा, हरभरा आदी कडधान्यांची उसळ पोषण आहारामध्ये देण्यात येत होती. त्याचबरोबर खजूर, राजगिरा लाडू, बिस्किटे, केळी आदी वस्तू पूरक आहार म्हणून दिल्या जात होत्या. गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रभाव कमी झाल्यामुळे शासनाने आता मार्गदर्शक सूचना जारी करीत काही अटींवर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शाळेतील पोषण आहाराची खिचडी बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी आता विद्यार्थ्यांना न्युट्रिटीव्ह (पोषक) स्लाइस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांना अधिकाधिक पोषण मूल्ये मिळावीत यासाठी तांदूळ, नाचणी, बाजरी, ज्वारी, सोयाबीन यांसह लोहयुक्त गव्हाचे पीठ, पिठी साखर, खाद्यतेल, मलई विरहित (स्किम्ड) दूध आणि इतर पोषक घटक वापरून ती न्युट्रिटीव्ह स्लाइस बनविण्यात येणार आहेत. ते आकर्षक पद्धतीने पाकिटात सीलबंद करून महापालिका, पालिका, जिल्हा परिषद शाळा तसेच शासनमान्य सर्व अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे. न्युट्रिटीव्ह स्लाइस तयार करण्याचे कंत्राट जालना येथील दिव्या एसआरजे फुड्स एलएलपी या संस्थेला देण्यात आले आहे. एका वेळी २४ दिवसांसाठी लागणाऱ्या स्लाइस पुरविण्यात येणार असून, त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. आठवड्यातून पाच दिवस पोषण आहार देण्यात येणार असल्याचे आदेश शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिले आहेत.

खिचडीपेक्षा स्लाइस वितरित करणे सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. विद्यार्थ्यांनाही स्लाइस आवडतील.

- शशिकांत खैरमोडे, प्रतिनिधी, सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT