Windmill esakal
सातारा

पाटणात दुरुस्तीच्या नावाखाली पवनचक्क्या भंगारात; कोट्यवधींची उलाढाल!

अरुण गुरव

मोरगिरी (सातारा) : पाटण तालुक्यातील (Patan taluka) पवनचक्क्या (Windmill) दुरुस्तीच्या नावाखाली त्या भंगारमध्ये विकण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यातून कोट्यवधींची उलाढाल होत आहे. पवनचक्कीवरील काही अधिकारी व साहित्य विकणारी टोळी यांच्या संगनमताने हे प्रकार सुरू असल्याची चर्चा मोरणी विभागात सुरू आहे. (Officer Have Started Selling Windmills In Patan Taluka Satara Marathi News)

पाटण तालुक्यातील डोंगर पठारावर वेगवेगळ्या कंपन्यांकडून पवनऊर्जा प्रकल्प उभे केले आहेत.

पाटण तालुक्यातील डोंगर पठारावर (Mountain plateau) वेगवेगळ्या कंपन्यांकडून पवनऊर्जा प्रकल्प उभे केले आहेत. ते उभे करताना मोठ्या प्रमाणात साहित्य शेतकऱ्यांच्या शिवारात पडलेले होते. शेतकऱ्यांना कंपनीने मोबदला देतो म्हणून झुलवत ठेवले होते. त्यामुळे पडलेले साहित्य कोणाला थांगपत्ता लागायच्या आत भंगारमध्ये विकले जात असून, त्यातून लाखो रुपयांचे उलाढाल होताना दिसत आहे. तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता दुरुस्तीच्या नावाखाली पवनचक्क्यांना या टोळीने आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हात घातला आहे.

मोरणा विभागातील काहीर आंबेघर, पाचगणी, आब्रंग गोकूळ, सोनवडे वाल्मीकी पठारावर मोठ्या प्रमाणात पवनचक्क्या उभ्या राहिल्या. मध्यंतरी हुंबरणे येथे उभी केलेली पवनचक्की बांधकामासहित पडली होती. त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. संबंधित पवनचक्की रातोरात गॅस कटरने कापून त्याची विल्हेवाट लावण्यात आली होती. आता पवनचक्क्या शॉर्टसर्किटमुळे जळालेले प्रकार मोठ्या प्रमाणात घडू लागले आहेत. त्या दुरुस्तीच्या नावाखाली भंगारच्या भावात विकल्या जात असून, गॅस कटरच्या साह्याने रातोरात पवनऊर्जा प्रकल्पाचे साहित्य कापून भंगारात विकले जात आहे. त्यातून कोट्यवधींची उलाढाल सुरू असल्याची चर्चा मोरणा विभागात आहे.

Officer Have Started Selling Windmills In Patan Taluka Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT