Krishna Sugar Factory esakal
सातारा

'कृष्णा'च्या निवडणूक प्रचारात नियमांचा भंग केल्यास कारवाई होणार

सचिन शिंदे, हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील (Krishna Sugar Factory Election) उमेदवार प्रचार करत आहेत. लॉकडाउनच्या (Coronavirus Lockdown) नियमाचा भंग होणार नाही, याची काळजी घेऊन प्रचार करावा, अशी नोटीस कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर (Officer Prakash Ashtekar) यांनी निवडणुकीतील उमेदवारांना दिली आहे. (Officer Prakash Ashtekar Orders Not To Violate Rules In Krishna Sugar Factory Election Satara Political News)

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील उमेदवार प्रचार करत आहेत.

जिल्हा उपनिबंधक आष्टेकर यांनी दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे, की कृष्णा कारखान्याच्या संचालक मंडळाची सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. त्यात प्रत्येक उमेदवार व त्याच्या पॅनेलतर्फे प्रचार सुरू आहे, असे निदर्शनास येत आहे. शासनाने कोविडचे नियम केले आहेत. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनीही लॉकडाउन घोषित केला आहे. निवडणुकीसाठी आपण व आपले पॅनेलमार्फत निवडणूक प्रचार मोहीम सुरू केली आहे. मात्र, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. कोविडच्या रुग्णांची वाढ पाहता पॅनेल व त्यांच्या उमेदवारांनी ते आदेश पाळणे बंधनकारक आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेऊन निवडणूक प्रचार करावा. प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करावा.

तिघांची आज माघार

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या आणखी तीन उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले. तरीही अद्याप २०२ उमेदवार रिंगणात आहेत. काले-कार्वे गटातून उदयसिंह पाटील, राजेश जाधव यांनी, तर येडेमच्छिंद्र गटातून रामचंद्र महिंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

Officer Prakash Ashtekar Orders Not To Violate Rules In Krishna Sugar Factory Election Satara Political News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT