कऱ्हाड ः येथील कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाग्रस्त रुग्णांना कोरोनामुक्त करण्याचे त्रिशतक आज पार केले. आज 16 रुग्णांना टाळ्यांच्या गजरात घरी पाठविण्यात आले. कृष्णा हॉस्पिटलमधून आतापर्यंत तब्बल 310 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना कृष्णा हॉस्पिटलमध्ये आश्वासक स्थिती आहे.
कृष्णाने कोरोनामुक्तीचे त्रिशतक पूर्ण करताना आज डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांमध्ये उरूल- पाटण, नवसरी-पाटण, परभणी, सडा दाडोली, तुळसण, हलवळेवाडी-बहुले, तारूख, काजरेवाडी-खळे, जखीणवाडी, लटकेवाडी येथील 16 रुग्णांचा समावेश आहे. या वेळी कोरोनाची लढाई यशस्वीपणे जिंकलेल्या कोरोनामुक्त रुग्णांना तहसीलदार अमरदीप वाकडे, पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र- कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, परीक्षा नियंत्रक डॉ. रजनी गावकर, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, सहायक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. नम्रता कदम, योगेश कुलकर्णी आदींच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
(संपादन ः संजय साळुंखे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.