फलटण शहर (सातारा) : सातारा जिल्ह्यातील आपल्या सर्वांसाठी प्रवीण जाधव यांची ऑलम्पिकसाठी भारतीय संघात (Indian Team) झालेली निवड ही अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर (Sanjeevraje Naik-Nimbalkar) यांनी काढले. सरडे (ता. फलटण) येथील धर्नुविद्या खेळाडू प्रवीण जाधव (Archery Player Pravin Jadhav) यांची टोकियो जपान (tokyo olympics 2021) येथे होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत निवड झाल्याबद्दल संजीवराजे यांच्या हस्ते प्रवीणचे वडील रमेश जाधव व आई संगीता जाधव यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. (Olympic Archery Player Praveen Jadhav Parents Felicitated By Sanjeevraje Naik-Nimbalkar Satara Marathi News)
प्रवीण जाधव यांना ऑलम्पिकमध्ये खेळण्यासाठी संधी मिळाली आहे. अनेक अडथळे दूर करून जाधव यांनी ऑलम्पिकमध्ये स्थान निश्चित केले आहे.
यावेळी आमदार दीपक चव्हाण (MLA Deepak Chavan) यांची प्रमुख उपस्थिती होती. ललिता बाबर (Lalita Babar) यांच्यानंतर आपल्या गावातील प्रवीण जाधव यांना ऑलम्पिकमध्ये खेळण्यासाठी संधी मिळाली आहे. अनेक अडथळे दूर करून जाधव यांनी ऑलम्पिकमध्ये स्थान निश्चित केले आहे. सातारा जिल्ह्यातील खशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांच्यानंतर जाधव हे निश्चित देशासाठी पदक मिळवून देतील, असा विश्वास संजीवराजे यांनी व्यक्त केला.
संजीवराजे पुढे म्हणाले, ज्या खेळाची सामान्यांना माहिती नाही, अशा धर्नुविद्या खेळात प्रवीणने मिळविलेले यश अभिमानास्पद आहे. गावातील विविध खेळांत मिळविलेले यश व त्यांची क्रीडा प्रबोधनीत झालेली निवडही कौतुकास्पद आहे. दरम्यान, आमदार चव्हाण व संजीवराजेंच्या हस्ते राष्ट्रीय खेळाडू पूजा शेंडगे (हॉकी), स्वाती जाधव (हॉकी), ऐश्वर्या बेलदार (जिम्नॅस्टिक), पूजा जोरवर (टेबल टेनिस) यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, महादेव माने, सुखदेव बेलदार, संभाजी निंबाळकर, सुरेश बेलदार, ग्रामपंचायत सदस्य दत्ता भोसले, उपसरपंच महादेव विरकर, नवनाथ धायगुडे, संजय जाधव, सत्यवान धायगुडे, कांतीलाल बेलदार, विशाल मोरे, मारूती चव्हाण, काळूराम चव्हाण, सुभेदार शेंडगे, नाना चव्हाण, सचिन घोलप आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Olympic Archery Player Praveen Jadhav Parents Felicitated By Sanjeevraje Naik-Nimbalkar Satara Marathi News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.