One killed 15 passengers injured in ST-bike collision accident satara police hospital  Sakal
सातारा

Satara Accident : एसटी-दुचाकीच्या धडकेत एक ठार, १५ प्रवासी जखमी

 खटाव- भूरकवडी रस्त्यावर कारीचा मळा शिवारात जाधव लवणा लगत सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला

राजेंद्र शिंदे

खटाव - भूरकवडी रस्त्यावर कारीचा मळा शिवारात, जाधव लवणा लगत एस टी बस आणि दुचाकीची समोरासमोर भिषण धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गणेश तानाजी काटकर (वय ३८) याचा जागीच मृत्यू झाला. तर १५ प्रवाशी जखमी झाले. 

खटाव- भूरकवडी रस्त्यावर कारीचा मळा शिवारात जाधव लवणा लगत सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा भिषण अपघात झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार खटाव कडून वडूजकडे निघालेली पुणे स्टेशन - वडूज ही एस टी बस ( एम एच ०६ एस ८१७५ ) व वडूज कडून खटाव कडे निघालेला दुचाकीस्वार ( यू के ०५ ए ५५५९) या दोघांमध्ये समोरा समोर भिषण धडक झाली.

या धडकेत दुचाकीस्वार गणेश तानाजी काटकर, रा कुकुडवाड, (ता माण ) जागीच ठार झाला. धडके नंतर एस टी बस पाणी वहात असलेल्या पाटावरुन पलिकडच्या पोपट जाधव यांच्या घराशेजारच्या झाडावर जाऊन आदळली. या धडकेत मोठे झाड तुटून पडले. बसच्या केबीनचे प्रचंड नुकसान झाले .

बसच्या काचा निखळून पडल्या. यावेळी येथील जाधव कुटुंबातील सदस्यांनी बसच्या चालकाला केबीनमधून बाहेर काढण्यासाठी तर वडूज येथील प्राथमिक शिक्षक अमोल ढगे ,सागर माने तसेच बारामती येथील आर. सी. ग्रुप चे रोहन चव्हाण, बाळाभाऊ जाधव, भारत चावले, पारस बाबर, अभी खराडे, सौरभ नांदुगुडे, लखन सकट यांनी जखमींना बसमधून बाहेर काढले.

जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून वडूज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच पुसेगाव पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. यावेळी खटाव व भूरकवडी येथील ग्रामस्थांनी अपघात स्थळीमोठी गर्दी केली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : प्रकाश आंबेडकर, AIMIM अन् अपक्ष, महाराष्ट्रात कोणाचा खेळ बिघडणार? गणित समजून घ्या...

स्टार प्रवाहच्या नायिकेची झी मराठीवर एंट्री; 'लक्ष्मी निवास' मालिकेत देणार पाठक बाईंना टक्कर; पाहा नवा प्रोमो

Mumbai Vidhansabha Result: दक्षिण मुंबईतील कौल नक्की कोणाला? मनसेमुळे लढतीत रंगत!

Jaggery Poha Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा गोड गुळाचे पोहे, लगेच लिहा रेसिपी

AUS vs IND 1st Test: बुमराहने टॉस जिंकल्याने टीम इंडियाचा पर्थ कसोटीत विजयही पक्का? वाचा काय सांगतायेत रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT