Onion Auction esakal
सातारा

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! लोणंदला आज कांदा लिलाव बंद राहणार? कामगार-व्यापाऱ्यांत गैरसमजाचा परिणाम

आज बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या कांद्याचे लिलाव (Onion Auction) होणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे.

रमेश धायगुडे

कामगारांनी कांदा पिशवीत पुन्हा भरण्यास ऐनवेळी नकार देत काम बंद ठेवल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली.

लोणंद : लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Lonand Krushi Utpanna Bazar Samiti) आवारात किरकोळ कारणांवरून कामगार व व्यापारी यांच्यात झालेल्या समज-गैरसमजामुळे आज (गुरुवारी) कांद्याच्या बाजारात कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय लोणंद मार्केट यार्डातील कांदा व्यापाऱ्यांनी घेतल्याचे समजते आहे.

त्यामुळे आज बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या कांद्याचे लिलाव (Onion Auction) होणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे. मात्र, बाजार समितीचे सभापती प्रा. सुनील शेळके- पाटील यांनी कांद्याचे लिलाव सुरूच राहावेत, यासाठी ठोस भूमिका घेत उद्या संचालक मंडळ, व्यापारी व कामगारांची तातडीची बैठक बोलावल्याचेही समजते आहे. कोणत्याही स्थितीत लिलाव सुरू ठेवण्याचा बाजार समितीचा प्रयत्न आहे. मात्र, शेतकऱ्यांत याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

लोणंद मार्केट यार्डात सध्या १८०० ते २००० पिशव्यांपर्यंत कमी प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील कोणत्याच व्यापाऱ्यांना कांदा खरेदीसाठी पुरत नाही. कांद्याचे ट्रक भरती होत नाहीत. त्यातून कांद्याचे भावही चार ते साडेचार हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलला तेजीत निघत आहेत. मागणीप्रमाणे कांद्याचा पुरवठा होत नाही, अशी अवस्था आहे. त्यातून येथील बाजारात कांदा विक्रीसाठी आल्यावर प्रथम कांद्याचे वजन होते. त्यानंतर तो व्यापारी काट्यावर उतरवला जातो. त्यानंतर लिलाव होतात.

लिलावाच्यावेळी फोडलेली कांद्याची पिशवी, येथील कामगार पुन्हा पिशवीत कांदा भरत असतात. मात्र, या प्रक्रियेदरम्यान अनेकदा किलो, दोन किलो कांदा लपवण्याचे प्रकार होत असल्याची तक्रार व्यापारी वर्गाकडून झाल्याने गेल्या सोमवारी (ता. चार) लिलावानंतर कामगारांनी कांदा पिशवीत पुन्हा भरण्यास ऐनवेळी नकार देत काम बंद ठेवल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यामुळे यावर ठोस निर्णय व्हावा, यासाठी व्यापाऱ्यांनी उद्या कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे.

पणन महामंडळाच्या नियमानुसार प्रथम व्यापारी काट्यावर आवक उतरवणे, त्यानंतर लिलाव व लिलावानंतर वजनकाटा व्हावा. जेणेकरून शेतकरी वजन होईपर्यंत आपल्या मालाजवळ थांबून राहतील आणि कांद्याच्या होणाऱ्या लपवालपवीलाही आळा बसेल, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे. मात्र, ही बाब शेतकऱ्यांना त्रासदायक आहे. त्यामुळे बाजार समिती, कामगार व शेतकरीही व्यापाऱ्यांच्या या म्हणण्याला तयार नाहीत. ज्या व्यापाऱ्यांच्या काट्यावर कांदा उतरवला आहे, त्यांनीच आलेल्या मालाची काळजी घ्यावी.

त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अथवा कामगारांची नेमणूक करावी. दरम्यान, यावर निर्णयासाठी आज (गुरुवार) बाजार समितीच्या संचालक, व्यापारी व कामगार प्रतिनिधींची तातडीची बैठक बोलावल्याचे समजते आहे. मात्र, शेतकऱ्यांत याबाबत काहीशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मात्र, उद्या बाजारात कांद्याचे लिलाव नेहमीप्रमाणे सुरू राहतील, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT