सातारा

सातारा : सायन्स, डीजी कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, मग हे वाचाच

दिलीपकुमार चिंचकर

सातारा : येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ सायन्समध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. ही प्रक्रिया 14 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांनी दिली. इयत्ता बारावीचा निकाल नुकताच लागला आहे. त्याअनुषंगाने कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना घरी बसल्या प्रवेश घेता यावा यासाठी सायन्स कॉलेजने प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु केली आहे.
मराठा जात प्रमाणपत्र असे काढा

बीएससी भाग एक सामान्य विज्ञान (general science) व व्यवसायिक अभ्यासक्रम (professional courses) यामध्ये बी एस सी बायोटेक्‍नोलॉजी 60 जागा, अॅनिमेशन सायन्स 60 जागा, नॅनोसायन्स 60 जागा, फॉरेन्सिक सायन्स 60 जागा, फूड प्रोसेससिंग अँड पॅकेजिंग (120 जागा), बी.व्होकेशनकल सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंट 50 जागा, कॉम्पुटर सायन्स 80 जागा या वर्गाच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया 14 ऑगस्ट 2020 या कालावधीत पर्यंत सुरू राहतील. याशिवाय एमएससी भाग एकचा निकाल जाहीर झालेला आहे. एम एस सी भाग दोनची प्रवेशप्रक्रिया 31 जुलै पर्यंत सुरू राहील.

याबरोबरच बीएससी भाग दोन व तीनच्या ऑनलाईन प्रवेश संदर्भात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर भेट द्यावी. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी www.ycis.ac.in या संकेतस्थळावर भेट देऊन आपला ऑनलाईन प्रवेश नोंदणी पूर्ण करावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य कानडे यांनी केले आहे. 

गृहमंत्र्यांसमाेर त्याचे गंभीर वर्तन, कदाचित मोठी किंमत मोजावी लागली असती

मोठी बातमी : २६ जुलैपासून सुरु होणार अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, 'असे' आहेत प्रवेशासाठीचे तीन टप्पे

धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाचे आवाहन
 
येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात बी. कॉम (रेग्युलर), बी.कॉम (इन्फॉरमेशन टेक्‍नॉलॉजी), बी.कॉम (बॅंक मेॅनेजमेंट), बी.सी.ए. ,बी.व्होक इन फायनानशियल मार्केटस्‌ ऍण्ड सर्व्हीसेस, बी व्होक इन अकाऊंटींग ऍण्ड टॅक्‍सेशन हे पदवी कोर्स सुरु आहेत. तसेच कम्युनिटी कॉलेज अंतर्गत वेब डिझाईनींग ऍण्ड मॅनेजमेंट हा ऍडव्हान्सड्‌ डिप्लोमा सुरु आहे. तरी विद्यार्थ्यांनी या विविध कोर्सच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्यावे, असे आवाहन प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड यांनी केले आहे. 

शाब्बास! वीटभट्टी कामगाराच्या मुलाला बारावीत 94 टक्के गुण

धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाच्या www.dgccsatara.edu.in प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक उपलब्ध आहे. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आल्याची माहिती प्राचार्या डॉ. गायकवाड यांनी दिली. बी. कॉम भाग एक या वर्गाच्या प्रवेशासाठी प्रा. डॉ. व्ही. के. सावंत, बी. व्होक इन अकाऊंटींग ऍण्ड टॅक्‍सेशन प्रा. एस.आर सुर्यवंशी, बी. कॉम (इन्फॉरमेशन टेक्‍नॉलॉजी या 
वर्गासाठी प्रा. डॉ. डी.टी. चवरे, बी.कॉम (बॅंक मॅनेजमेंट) वेब करीता प्रा. डॉ. व्ही.एम.कुंभार, बी.सी.ए. व ऍडव्हान्स डिप्लोमा डिझायनिंग ऍण्ड मॅनेजमेंट करिता प्रा. डॉ. एस.ए. कुरकुटे व प्रा. व्ही. एस घाडगे व बी.व्होक इन फायनानशियल मार्केट्‌स ऍण्ड सर्व्हीसेस करिता प्रा. व्ही.डी.पाटील यांच्याशी संपर्क साधावा.

विद्यार्थ्यांनी 29 ऑगस्टपुर्वी प्रवेश घ्यावेत. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील अर्जात http://dgcc.rayatdc.com येथे लॉगिन करुन त्यामध्ये आपली संपूर्ण माहिती भरावी. दरम्यान प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरताना काही अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्या डॉ. गायकवाड यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत जी महाविद्यालये सहभाग घेणार नाहीत तेथे प्रवेश होणार नाहीत, असे यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे. वाचा सविस्तर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT