Prithviraj Chavan esakal
सातारा

Prithviraj Chavan : 'या' पालकमंत्र्यांविरोधात महाविकास आघाडी तगडा उमेदवार देणार; पृथ्वीराज चव्हाणांची मोठी घोषणा

सकाळ डिजिटल टीम

‘‘विधानसभेची जिल्ह्यातील निवडणूक महाविकास आघाडी मिळून लढणार असून, जागा वाटपाबाबत आमची आज (मंगळवार) दिल्लीत बैठक होणार आहे.''

सातारा : विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असून, जागा वाटपाची चर्चेला सुरुवात झाली असून, जागा वाटपाबाबत आज (मंगळवारी) दिल्लीत बैठक होणार आहे. महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करेल, असेच उमेदवार दिले जाणार आहेत. त्यासाठी कोणत्या मतदारसंघात कोणाची ताकद जास्त त्याप्रमाणे जागा वाटप होईल. पालकमंत्र्यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघात लोकसभेला आमची वाढलेली मते लक्षात घेता येथे विधानसभेला ‘महाविकास’तर्फे उमेदवार उभा केला जाईल आणि तो विजयी होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केला.

काँग्रेस भवनात (Congress) आगामी विधानसभेच्या आढावा बैठकीनंतर श्री. चव्हाण यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, मनोहर शिंदे, रणजितसिंह देशमुख, झाकिर पठाण, अन्वरपाशा खान आदी उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘‘विधानसभेची जिल्ह्यातील निवडणूक महाविकास आघाडी मिळून लढणार असून, जागा वाटपाबाबत आमची आज (मंगळवार) दिल्लीत बैठक होणार आहे. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात कोणाची ताकद जास्त आहे, हे पाहून मतदारसंघांची मागणी होईल. महाविकासमधील तीन पक्षांची एकत्रित बैठकीतूनच यावर निर्णय होईल. महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करेल, असाच उमेदवार आम्ही देणार आहोत.’’ पालकमंत्री देसाईंच्या पाटण मतदारसंघात महाविकासची मते वाढली आहेत. याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘‘पाटण मतदारसंघात ‘महाविकास’चा उमेदवार उभा केला जाईल व तो विजयी होईल.’’

लोकसभेला आम्ही कमी पडलो....

सातारा लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवाराच्या पराभवाची कारणे सांगताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘‘आम्ही सगळे कमी पडलो असून, याची जबाबदारी आमची आहे. मुळात तिकीट आणणे, ते घोषित होणे आणि प्रत्यक्ष प्रचारास सुरुवात होण्यास थोडा उशीर झाला, त्यामुळे आम्ही कमी पडलो, तसेच पिपाणी चिन्ह आयोगाने गोठवले नाही, त्याचा फटका आम्हाला बसला.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT