Corona Center esakal
सातारा

वरकुटे-मलवडीतील कोरोना सेंटर रुग्णांसाठी ठरतेय 'संजीवनी'

केराप्पा काळेल

कुकुडवाड (सातारा) : कोरोनाने (Coronavirus) जगभर थैमान घातले आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांना रुग्णालयात बेड्स उपलब्ध होत नाहीत. बेड मिळत नसल्याने अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. अनेकांना वेळेत उपचार मिळत नसल्याने कोरोना रुग्णांचा (Corona Patient) मृत्यूही होत आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे रुग्णालयात बेड्स उपलब्ध नसणे आणि त्यामुळे होणारे रुग्णांचे हाल थांबवण्यासाठी वरकुटे-मलवडी येथील माणदेश फाउंडेशन संचालित संकल्प कोरोना केअर सेंटर (Corona Care Center) ग्रामीण भागातील रुग्णांना संजीवनी ठरत आहे. सामाजिक बांधिलकी जपत यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये हे कोविड सेंटर बनवले आहे. (Patients Are Getting Better Facilities At Corona Care Center At Varakute-Malwadi)

कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांना बेड्स उपलब्ध नाहीत.

वरकुटे-मलवडी परिसरात ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्तांची होणारी फरफट थांबवण्यासाठी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह खाशेराव जगताप यांच्या प्रयत्नाने गावातील हायस्कूलमध्ये ७ ऑक्सिजन बेडसह (Oxygen Bed) ६० बेडचे सुसज्ज असे कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. यामध्ये परिसरातील कुरणेवाडी, महाबळेश्वरवाडी, बनगरवाडी, शेनवडी, कळचौंडी, जांभूळनी, वळई इत्यादी गावातील रुग्ण उपचार घेत आहेत.

Corona Care Center

अनेकवेळ रुग्णांना खाजगी रुग्णालयामध्ये (Private hospital) बेड न मिळणे, कधी पैशाभावी उपचार नाकारणे अशा अनेक अडचणीमुळे वरकुटे-मलवडी येथील 'संकल्प' कोविड केअर सेंटर परिसरातील रुग्णांना संजीवनीच ठरत आहे, असे म्हणावे लागणार आहे. कोविड केअर सेंटरमध्ये सर्व उपचार मोफत होत आहेत. तसेच रुग्णांचा HRCT करायचा असल्यास म्हसवड येथे जाण्यासाठी मोफत रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध आहे. या सेंटरचा संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कक्षेत असल्यामुळे सर्व परिसरावर नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, येथील रुग्णांवर तज्ञ एमडी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केले जातात. त्याचबरोबर संजय जगताप, सरपंच विजय जगताप, बाळासाहेब आटपाडकर, धीरज जगताप, हनुमंत आटपाडकर, अमोल जगताप, जालिंदर वाघमोडे, दिलीप खरात, सागर यादव आणि ऋषिकेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांची मोठी टीम रुग्णांच्या सेवेसाठी सदैव हजर असते.

Patients Are Getting Better Facilities At Corona Care Center At Varakute-Malwadi

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT