सातारा : राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कोरोनाची देशात एंट्री झाल्यापासून पायाला भिंगरी बांधत पालकमंत्री असलेल्या वाशिम जिल्ह्यासह त्यांच्या सातारा जिल्ह्यात दक्षता घेण्यासाठी उपाययोजना केल्या. दौऱ्यांवर दौरे घेत अधिकाऱ्यांना सूचना करीत 24 तास कार्यरत राहिले. मात्र, त्यांच्या मतदारसंघातील पाटणच्या विश्रामगृहात कोयना पर्यटन विकास आराखडा आढावा बैठकीत मंत्री देसाईंच्या उपस्थितीत नियमांचे उल्लंघन पाहायला मिळाले. या बैठकीत मंत्री देसाईंच्या शेजारी असलेली एक व्यक्ती मास्क न लावता बसलेली होती. त्याची मोठी किंमत कदाचित मोजावी लागली असती, असा सूर व्यक्त झाला.
स्थानिक आमदारांना विचारले होते काय....
त्याची विना मास्क हजेरी ही गंभीर बाब होती. त्यामुळे मंत्री देसाईंसह तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांसाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल. एकीकडे मंत्री महोदय बैठकांवर बैठका घेताहेत आणि त्यांच्याच बैठकीत त्यांच्यालगत विनामास्क बसणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासन, प्रशासन अहोरात्र कष्ट घेत आहे. नागरिकांनी तोंडावर मास्क लावावा, सोशल डिस्टन्सच पालन करावे, हात धुताना सॅनिटायझरचा वापर करा, समूह टाळा अशा वारंवार सूचना दिल्या जात आहेत. पथनाट्यापासून ते घराघरांत जाऊन कोरोना योध्ये नागरिकांचे प्रबोधन करीत आहेत. गृहराज्यमंत्री देसाईही जनतेच्या काळजीपोटी झटत आहेत. जिल्ह्यातील तालुका अन तालुका त्यांनी पिंजून काढला. कोरोनाबाबत जनजागृती केली. विना पास जिल्ह्यात कोणीही येऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार सक्त सूचना करीत आहेत. शासनाच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास ताबडतोब कारवाई करण्याचे आदेशही दिले जाताहेत.
गुजरातला चोरुन नेत असलेली वाळू महाराष्ट्रातील 'या' तहसीलदारांनी राेखली
...तर पुढची 25 वर्षे मराठा समाजाला आरक्षण नाही
तोंडाला मास्क नसणे, अथवा सोशल डिस्टन्सचं पालन न केल्यास दंडात्मक कारवाईचे आदेशही मंत्री देसाई यांनी काही दिवसांपूर्वी ते घेत असलेल्या बैठकांमध्ये देताहेत. पण, पालथ्या घड्यावर पाणी असा काहीसा प्रकार पाटण येथील एका बैठकीत दिसून आला. शासन, प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचा बैठकीत फज्जा उडाला. या बैठकीत एक व्यक्ती विना मास्क बसलेली. ही बैठक पाटण येथील विश्रामगृहात कोयना पर्यटन विकास आराखडा आढाव्यासाठी होती. या बैठकीत प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक महादेव मोहिते, सुरेश साळुंखे, कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी कुमार पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, सरपंच शैलेंद्र शेलार यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
कोयनातील बहुउद्देशीय प्रकल्प पावसाळ्यानंतर सुरू करा : शंभूराज देसाई
पाटणच्या बैठकीत गृहमंत्र्यांच्या समोर जो काही प्रकार घडला तो नक्कीच धोकादायक असून, याचा मंत्री देसाईंसह तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनाही धोक्याची घंटा ठरु शकला असता. गृहराज्यमंत्र्यांच्या विकासकामांचे काैतुक म्हणून पाटणच्या बैठकीचे छायाचित्रासह वृत्तांकन साेशल मिडियावर कार्यकर्ते पाेस्ट करीत आहेत. मात्र त्याचवेळी गृहराज्यमंत्री जनतेच्या काळजीपाेटी कार्यरत असले तरी संबंधितांनीही त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे असा सूर उमटू लागला आहे.
Edited By : Siddharth Latkar
उदयनराजे म्हणतात हा काळ कठीण असला तरी...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.