Murder Case Karad Police esakal
सातारा

पेट्रोलच्या पावतीने उलगडले कर्नाटकातील खुनाचे क्रौर्य; Mobile Location मुळं खुनाच्या गुन्‍ह्याचा पर्दाफाश, नेमकं काय घडलं?

पोलिसी खाक्या दाखविताच मंजुनाथ सारे घडाघडा बोलला.

सकाळ डिजिटल टीम

मृतदेह वनवासमाचीत जाळण्याचा प्रयत्न झाला. तो जाळताना झालेल्या गडबडीत मंजुनाथच्या खिशातील पेट्रोलची पावती घटनास्थळी पडली.

वहागाव : गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीचा बंदोबस्त आटोपून सारेच जिल्ह्यातील पोलिस दल निवांत झाले असतानाच कऱ्हाड तालुक्यातील वनवासमाची येथे खुनानंतर (Murder Case) एकाला जाळून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार पहाटेच उघडकीस आला.

सहायक पोलिस निरीक्षक राहुल वरुटे यांनी मृतदेहाशेजारी आढळलेल्‍या पेट्रोल बिलावरून (Petrol Bill) या खुनाचा उलगडा केला. हातात काहीही ठोस पुरावा नसताना केवळ तांत्रिक तपासाच्या आधारावर मंजुनाथला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तशी ती रिस्कच होती.

मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच मंजुनाथ सारे घडाघडा बोलला. जिल्ह्यातील पहिला असा गुन्हा असेल ज्यामध्ये खून झालेल्याची ओळख पटण्यापूर्वी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यात आली. त्याचे नाव केशवमूर्ती असल्याचे पोलिसांसमोर आले.

केशवमूर्ती हा मंजुनाथचा चुलत मेव्हणा असल्याचेही तपासात पुढे आले. सरकारी नोकरी लावतो, असे सांगून मंजुनाथसहीत तिघांनी केशवमूर्तीकडून पाच लाख रुपये घेतले होते. त्यामुळे त्याच्या खुनाचा कट रचल्याचे तपासात पुढे आले आहे. मंजुनाथला बंगळुरातून तर जखमी प्रशांतला पुण्यातून एकाचवेळी अटक करण्यात आली, तर प्रशांत बटवालला विजापुरातून काल रात्री अटक केली.

केशवमूर्तीचा खून हुबळीच्या दरम्यान झाल्याचा संशय आहे. मात्र, त्याचा मृतदेह वनवासमाचीत जाळण्याचा प्रयत्न झाला. तो जाळताना झालेल्या गडबडीत मंजुनाथच्या खिशातील पेट्रोलची पावती घटनास्थळी पडली अन् तीच पावती संशयितांची कर्दनकाळ ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

सुबोध-तेजश्रीचे जुळले सूर ; बहुप्रतीक्षित हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Dev Diwali 2024: देव दिवाळी का साजरी केली जाते? वाचा इतिहास अन् धार्मिक महत्व

Supriya Sule In Nashik : कांद्याला हमीभाव मिळवून देणार; खासदार सुप्रिया सुळे यांची चांदवडच्या सभेत ग्वाही

SCROLL FOR NEXT