सातारा

निंबळकच्या 'त्या' मृतदेहाचे गुढ उकलले, प्रेमसंबंधातून मेहुणीचाच खून, गिरवीत एकास अटक

किरण बाेळे

फलटण शहर ः निंबळक (ता. फलटण) येथे आढळलेल्या 19 वर्षीय तरुणीच्या मृत्यूचे गुढ उकलले आहे. तिचा खून तिच्या दाजीनेच प्रेमसंबंधातून केल्याचे निष्पन्न झाले आहे. भाग्यश्री तथा पूजा दयानंद गायकवाड (वय 19, रा. खेराडी, ता. कडेगाव) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. श्रीकांत रामदास भोसले (रा. गिरवी, ता. फलटण) असे दाजीचे नाव आहे.
माण तालुक्‍यात कोरोनाचे शतक
 
एक जुलै रोजी निंबळक गावच्या हद्दीमध्ये एका तरुणीचा खून करून तिचा मृतदेह विहिरीमध्ये टाकला होता; परंतु तरुणीची ओळख पटू शकली नव्हती. मृत तरुणीच्या वर्णाशी मिळती जुळती तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंद आहे का, याची माहिती घेतली असता कडेगाव पोलिस ठाण्यात भाग्यश्री तथा पूजा दयानंद गायकवाड (रा. खेराडी, ता. कडेगाव) ही तरुणी बेपत्ता असल्याची व तिचे वर्णन मृत तरुणीशी मिळत असल्याचे दिसून आले. मुलीचे वडील दयानंद गायकवाड व आई मालन गायकवाड यांनी मुलीचे कपडे, अंगठी व फोटो पाहून ती आपलीच मुलगी असल्याचे सांगितले. आपला जावई श्रीकांत रामदास भोसले हा गिरवी (ता. फलटण) येथे राहात असल्याचे सांगितले.

सातारा पोलिस दलावर कोसळला दुःखाचा डोंगर

भोसले याचे भाग्यश्रीशी प्रेमसंबंध होते. तिने आपल्यामागे लग्न करण्याचा तगादा लावला होता; परंतु मला लग्न करायचे नव्हते. 29 जून रोजी ती गिरवी येथे भेटायला आल्यावर संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मी तिला माझ्या मोटारसायकलवरून गिरवी, दुधेबावी, वडलेमार्गे निंबळक गावचे हद्दीतील बनकर वस्ती येथील उसाचे शेतात नेले. तेथे तिचा गळा व तोंड दाबून खून करून तिच्याकडील पिशवीतील ब्लॅंकेटमध्ये तिला गुंडाळून उसाचे शेतात रात्री आठच्या सुमारास टाकून दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी अडीच वाजता रस्त्याने कोणीही येत नाही, हे पाहून तिचा मृतदेह उसाच्या शेतातून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीच्या शेजारी पाण्यात टाकून दिला, अशी श्रीकांतने कबुली दिल्याचे पाेलिसांनी सांगितले.

शेतक-यांची चिंता वाढली; काेराेनाबराेबरच हेही मोठे संकट

खूनप्रकरणी श्रीकांत भोसले यास अटक करण्यात आली आहे. पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन बोंबले तपास करीत आहेत. 

Edited By : Siddharth Latkar

वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्‍वभूमीवर साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला 'हा' निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Vidhansabha: गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या महेश गायकवाडांची शिवसेनेतून हकालपट्टी

बाल्कनीच्या कठड्यावर पाय मोकळे सोडून ती... दिव्या भारती कशी पडली? २१ वर्षानंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

अशी ही बनवाबनवीच्या यशात महेश कोठारेंचाही होता वाटा ; सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर निर्मात्यांनी दिली शाबासकी

Assembly Election 2024: पंतप्रधानांच्या प्रचार दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला दीड तास उशीर?

Uddhav Thackeray: भिवंडीत माजी आमदार रुपेश म्हात्रे यांची हकालपट्टी, उद्धव ठाकरेंवर केली होती टीका

SCROLL FOR NEXT