Ramraje Naik-Nimbalkar vs Ranjitsingh Naik-Nimbalkar esakal
सातारा

'लोकसभेला मला 18,000 मते देऊन फलटणच्या जनतेने तुतारीला गाडले'; रणजितसिंहांचा पवारांसह रामराजेंना इशारा

सकाळ डिजिटल टीम

डॉ. आंबेडकर यांनी निर्माण केलेली लोकशाही मोडीत काढून आपल्‍याच कुटुंबातील लोकांना सत्तेवर बसवणाऱ्यांची झुंडशाही आता संपुष्टात आणण्याची वेळ आलेली आहे.

फलटण शहर : आगामी विधानसभा निवडणुकीत तुतारीचा कोणताही फरक पडणार नाही. लोकसभेला मला अठरा हजार मते देऊन फलटणच्या जनतेने तुतारीला गाडले आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी फलटण तालुक्याला देण्याऐवजी नेण्याचंच काम केलं आहे, त्यामुळे फलटणमध्ये आता तुतारी चालणार नाही. तालुक्यातील सहकार मोडीत काढून, गोरगरीब कुटुंबातील पोरांच्या पगारातील भाडं खाण्याचं काम कोण करत आहे, हे आता तालुक्याला समजलं आहे. त्यामुळे फलटण तालुक्यातील नारीशक्ती व जनशक्ती आमच्याच पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

फलटण येथे भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित लाडकी बहीण सन्मान सोहळा व महायुती कार्यकर्ता मेळाव्यात ते (Ranjit Singh Naik Nimbalkar) बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, सचिन कांबळे पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सदस्य माणिकराव सोनवलकर, विश्वासराव भोसले, समशेरसिंह नाईक निंबाळकर, जिजामाला नाईक निंबाळकर, मनीषा नाईक निंबाळकर, धनंजय साळुंखे पाटील, जयकुमार शिंदे, नानासाहेब इवरे, अशोकराव जाधव, विलासराव नलवडे, विराज खराडे, महादेव पोकळे, बजरंग गावडे, रणजितसिंह भोसले, सूर्यकांत दोशी आदींसह भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार रामराजे व त्यांच्या बंधूंनी तालुक्यात गेल्या तीस वर्षांत गुलामशाही निर्माण करून पुन्हा राजेशाही प्रस्थापित केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली लोकशाही मोडीत काढून आपल्‍याच कुटुंबातील लोकांना सत्तेवर बसवणाऱ्यांची झुंडशाही आता संपुष्टात आणण्याची वेळ आलेली आहे.

शरद पवार हे देशाचे नेते होते, तर रामराजेंना मुख्यमंत्र्यांपेक्षा वरचा दर्जा होता; पण त्यांनी केवळ पवार यांची सेवा करायची म्हणून तालुक्याचे पाणी, एमआयडीसी, रस्ते अडवले. गेल्या तीस वर्षांतील बारामती व फलटणमधील विकासाची तुलना पाहता आता सत्तांतर केल्याशिवाय पर्याय नाही, हे येथील जनतेला कळून चुकले आहे. त्‍यामुळे आता ही नारीशक्ती व जनशक्ती कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता महायुतीच्याच पाठीशी ठाम राहील, असा विश्वासही यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंकडून लक्ष्मण हाकेंचा "गोंडस लेकरू" म्हणून उल्लेख

Ranji Trophy 2024: जम्मूचा शुभम महाराष्ट्रावर पडतोय भारी; एकट्याने डाव उभारला अन् ठोकले दणदणीत द्विशतक

Uddhav Thackeray Dasra Melava: दसरा मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील 'हे' रस्ते असणार बंद!

Dussehra Melava 2024 Live Updates: मुंडे-जरांगेंच्या मेळाव्यातून रतन टाटांना श्रद्धांजली

सांगलीच्या जागेसाठी 'या' दोन नेत्यांत रस्सीखेच; विश्वजित कदम, विशाल पाटलांकडे कार्यकर्त्यांनी केली 'ही' मागणी

SCROLL FOR NEXT