Ramraje Naik-Nimbalkar esakal
सातारा

अजितदादांना मोठा धक्का! रामराजेंच्या सैन्याने फुंकली तुतारी; संजीवराजे, आमदार चव्हाण शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

Phaltan Politics Sanjivraje Naik Nimbalkar : तीस वर्षांच्या राजकारणात #ElectionWithSakal कार्यकर्त्यांचा विचार घेतल्याशिवाय आम्ही निर्णय घेतला नाही.

सकाळ डिजिटल टीम

रामराजे म्हणाले, ‘‘तुम्ही बिनधास्त जा... पण माझी एक अट आहे. आता संजीवराजेंनी आक्रमक व्हावे. माझा तुम्हाला पाठिंबा आहे. युतीत राहून मी तरी काय करणार?

फलटण शहर : विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या अध्यक्षतेखाली फलटणमध्ये झालेल्या राजे गटाच्या बैठकीत सर्वानुमते संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण (Deepak Chavan) हे कार्यकर्त्यांसह येत्या सोमवारी (ता. १४) राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील, असा निर्णय झाला. दरम्यान, ‘मी काय करायचे हे लवकरच ठरविणार असून, मी मनाने तुमच्यासोबत असेन; पण मी महायुतीचा प्रचार करणार नाही, हे काळ्या दगडावरील रेघ आहे, असे स्पष्ट मत रामराजे यांनी व्यक्त केले.

या वेळी आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjivraje Naik Nimbalkar), सुभद्राराजे नाईक निंबाळकर, शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, विश्वजितराजे नाईक निंबाळकर, डॉ. बाळासाहेब शेंडे, धनंजय पवार, माजी सभापती प्रतिभा धुमाळ, रेश्मा भोसले, नीता नेवसे, मिलिंद नेवसे, कृष्णाथ ऊर्फ दादासाहेब चोरमले, सौ. वैशालीताई चोरमले, शंकरराव माडकर, सुनील माने, सौ. खानविलकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, ‘‘तीस वर्षांच्या राजकारणात #ElectionWithSakal कार्यकर्त्यांचा विचार घेतल्याशिवाय आम्ही निर्णय घेतला नाही. आम्ही १९९१ ला तिघांनी मिळून राजकारण सुरू केले. सत्तेसाठी माणसे झगडत होती. तालुका तेथेच राहिला, हे आमचे वडील शिवाजीराजेंना पटत नव्हते. मालोजीराजेंनी जे संस्कार केले ते काम आम्ही पुढे नेत आहोत. तुमच्या मनात मी काय निर्णय घेईन याबाबत शंका आहे. काही गोष्टी बोलायच्या नसतात. जो निर्णय तुम्ही सांगितलाय त्याला माझा पाठिंबा आहे. अजित पवार मला भेटणार होते; पण त्यांचा प्रचारानिमित्त प्रवास सुरू आहे. संजीवराजेंनी मला तालुक्यात बोलावून घेतले आणि कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घ्यायचे ठरले.

शरद पवारांनी संधी दिल्यानंतरही मी अजित पवारांसोबत केवळ तुमच्यासाठी गेलो होतो. मी सभापती असताना सर्व काही स्थिरस्थावर होते. प्रशासनही ऐकत होते. मात्र, हे पद गेले आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदेंनी काय निर्णय घेतला पुढे काय झालं हे सर्वांना माहिती आहे. माझ्यासाठी तालुका व जिल्हा महत्त्वाचा आहे. मला हा निर्णय आपल्या वरिष्ठांना कळवावा लागेल. मी बाहेर पडणार की नाही, प्रचार करणार की नाही. हे प्रतिक्रिया काय येतात त्यावरून ठरवू.’’ रामराजे यांनी आपल्या भाषणात आमदार जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली.

आम्ही निर्णय घेतलाय... तुतारी घ्यायची...

संजीवराजे नाईक निंबाळकर बोलायला उभे राहिले आणि कार्यक्रमस्थळी तुतारीची धून वाजली. त्यावर एकच हशा पिकला. संजीवराजे म्हणाले, ‘‘आम्ही निर्णय घेतलाय. आमदार दीपकराव चव्हाण व मी स्वत: शरद पवारांकडे १४ तारखेला वेळ मागणार आहोत. त्यांनी १४ तारखेला वेळ द्यावीत. त्यांच्या उपस्थितीत आम्ही सर्व कार्यकर्त्यांसमवेत आपल्याच घरी चाललो आहोत. दुसरीकडे कुठे नाही. या निर्णयात कोणताही बदल होणार नाही. सर्वांनी ताकदीने उपस्थित राहावे.’’

संजीवराजेंनी आक्रमक व्हावे...

रामराजे म्हणाले, ‘‘तुम्ही बिनधास्त जा... पण माझी एक अट आहे. आता संजीवराजेंनी आक्रमक व्हावे. माझा तुम्हाला पाठिंबा आहे. युतीत राहून मी तरी काय करणार? कार्यकर्ते एका बाजूला आणि मी एकटा एका बाजूला राहून काय करणार आहे? दोन व्यक्तींमुळेच हे घडत आहे हे वारंवार वर सांगून झालेय. आता त्यांना आमचे कार्यकर्ते उत्तर देतील, हा शब्द मला द्या. तोंडाला तोंड द्यावे लागेल. आता आक्रमक राजकारण करावे, ते बूथपर्यंत पोहोचवावे. संजीवराजेंना शुभेच्छा... त्यांनी १४ तारखेला प्रवेश करावा.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर मोठी घटना! सुमारे 40-50 फूट खोलवर लागली आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT