Coronavirus Lockdown esakal
सातारा

आमच्याच दुकानांवरती कारवाई का?

सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (सातारा) : जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांच्या आदेशाचे उल्लंघन करू नका, असे आवाहन पोलीस व पालिकेने नागरिकांना केले होते. त्याला न जुमानता व्यापाऱ्यांनी (trader) दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पोलिसांनी यशस्वी होवू दिला नाही. लाॅकडाउनच्या (coronavirus lockdown) विरोधात होणारे आंदोलनही पोलिस व पोलिकेने रोखले. दरम्यान, दत्त चौकात मोठा फौजफाटा होता. यावेळी पोलीस उपाधीक्षक रणजीत पाटील (Deputy Superintendent of Police Ranjit Patil), पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. (Police Action Against Traders Violating Lockdown Rules In Karad Satara Marathi News)

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाचे उल्लंघन करू नका, असे आवाहन पोलीस व पालिकेने नागरिकांना केले होते.

प्रशासनाकडून परवानगी नसलेली दुकाने बंद करून सील करण्यात आली. त्यानुसार कारवाई सुरू असताना माझ्याच दुकानावरती कारवाई का, इतरांवर का नाही, असे म्हणत काही व्यापाऱ्यांनी अन्य दुकानांवरही कारवाईसाठी प्रशासनाला भाग पाडले. त्यावेळी व्यापाऱ्यांमध्ये काही काळ गोंधळ उडाला. यावेळी मंडई परिसरात जमाव जमत असल्याचे लक्षात येतात पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला पांगवले.

तसेच परवानगी नसताना व अत्यावश्यक सेवेत येत नसतानाही उघडलेल्या दुकानांवर पोलीस व पालिका प्रशासनाने कारवाई सुरू केल्याने काही वेळानंतर गोंधळ थांबला. त्यानंतर बराच वेळ नगरपालिका व पोलिसांची जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून उघडलेली दुकाने सिल करण्याची कारवाई सुरू होती. या कारवाईबाबत व्यापार यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Police Action Against Traders Violating Lockdown Rules In Karad Satara Marathi News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Merger: बँकांचे होणार विलीनीकरण; 43 वरून 28 होणार संख्या, काय आहे सरकारचा प्लॅन?

Nashik News : ‘नाट्यचौफुला’ तून 8 तासांचा नाट्यानुभव; मराठी रंगभूमीच्या इतिहासातील यशस्वी उपक्रम

मी ते कधीही विसरू शकणार नाही... 'वास्तव'च्या सेटवर संजय दत्तने संजय नार्वेकरांना दिलेली अशी वागणूक; म्हणाले-

Prostate Cancer : प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे नेमकं काय? या गंभीर आजाराची कोणती आहेत लक्षणे? जाणून घ्या..

Jalna Assembly Election 2024 : जालना विधासनभा खोतकरांना रोखण्यासाठी भाजप मैदानात

SCROLL FOR NEXT