police are aggressive to remove encroachment Satara Municipality negligence  esakal
सातारा

Satara News : अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिसच आक्रमक

सातारा पालिकेच्या दुर्लक्षाचा परिणाम; राजवाडा, मोती चौकासह अन्य भागांतील व्यापले रस्ते

सकाळ वृत्तसेवा

सातारा : शहरातील राजवाडा, मोती चौकासह इतर भागातील रस्‍त्‍यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. ती हटवण्‍याकडे पालिकेचे दुर्लक्ष आहे. पालिकेच्‍या दुर्लक्षामुळे पोलिस आक्रमक झाले आहेत.

त्‍यांनी मोती चौकासह इतर भागांतील अतिक्रमणे हटविण्‍यास सुरुवात केली आहे. पोलिस दल आक्रमक होत असताना पालिका मात्र, रस्‍त्‍यावरील विक्रेत्‍यांकडून पावत्‍यांच्‍या माध्‍यमातून ‘गल्ला’ गोळा करण्‍यात गुंतल्‍याचे दिसून येते.

शहरातील नागरिकांचे रोजचे दळणवळण राजपथ, पोलिस मुख्‍यालय, राधिका रोडवरून सुरू असते. या तिन्‍ही मार्गांवर जागा मिळेल तिथे पथाऱ्या टाकून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. राजवाडा, मोती चौक हा शहरातील मुख्‍य आणि वर्दळीचा भाग आहे.

या भागात असणाऱ्या चौपाटीलगत सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. रस्‍त्‍यालगत पथाऱ्या मांडत खेळणी, खाद्यविक्री करणाऱ्यांमुळे या मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते. येथील अतिक्रमणांवर कारवाई करण्‍याऐवजी पालिका दररोज येथून व्‍यवसाय पावती फाडण्‍यावर धन्‍यता मानते. पालिकेच्‍या या पावतीफाडो भूमिकेमुळे येथील वाहतूक समस्‍या दिवसेंदिवस जटिल बनत आहे.

वारंवार होणाऱ्या तक्रारींची दखल घेत शाहूपुरी पोलिसांनी याठिकाणी कारवाई करत रस्‍ता, पदपथावरील विक्रेत्‍यांवर गेले दोन दिवस कारवाई करण्‍याचा सपाटा लावला आहे. यामुळे या भागातील अतिक्रमणे काही प्रमाणात कमी झाली असली, तरी पोलिसांचा व्‍याप पाहता त्‍यांनी राबविलेल्‍या मोहिमेत सातत्‍य राहणार नाही, हे स्‍पष्‍ट होते. पोलिस कारवाई थंडावल्‍यानंतर येथील अतिक्रमणांची अवस्‍था पुन्हा जैसे थे होणार आहे. त्‍यासाठी पालिकेने ठोस उपाययोजना राबविणे आवश्‍‍यक आहे.

टेंपो मंडईला बाळसे...

राजवाडा बस स्‍थानक परिसरात दररोज रात्री आठच्‍या सुमारास अनेक जण टेंपोतून विक्रीसाठी भाजी घेऊन येतात. आठ ते दहा टेंपो रस्‍त्‍यालगत लावत ते व्‍यवसाय करत असल्‍याने बस स्‍थानकात येणाऱ्या बस, परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. मध्‍यंतरीच्‍या काळात याठिकाणची टेंपो मंडई बंद पडली होती. मात्र, ती पुन्‍हा नव्‍याने त्‍याचठिकाणी बाळसे धरू लागली आहे.

ठेकेदाराचा ठिय्या...

शहरातील रस्‍त्‍यांवरील अतिक्रमणे हटविण्‍याबरोबरच अनधिकृत फलक हटविण्‍यासाठी पालिकेने ठेकेदार नेमला आहे. डंपरमधून पालिकेने नेमलेल्‍या ठेकेदाराचे कर्मचारी फेऱ्या मारण्‍या पलीकडे कोणतेही काम करत नाही. मंगळवार तळे ते विठोबा नळ या मार्गावरच नेहमी त्‍यांचा ठिय्‍या असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT