सातारा

बनावट नोटा छपाईची यंत्रणा बोबडेवाडीतून हस्तगत; एकास अटक

राजेंद्र वाघ

कोरेगाव (जि. सातारा) : स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या येथील शाखेच्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये दोन हजारांच्या 19 बनावट नोटांचा भरणा केल्याप्रकरणी बोबडेवाडी (ता. कोरेगाव) येथील एकास पोलिसांनी अटक केली असून, संशयिताकडून नोटा छपाईसाठी लागणारी सामग्री हस्तगत करण्यात आली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सागर शांताराम शिर्के (रा. बोबेडेवाडी, ता. कोरेगाव) यास अटक झाली असून, संशयिताकडून प्रिंटर, स्कॅनर मशिन, पेपर, कोरी कागदे, अशी नोटा छपाईसाठी लागणारी सामग्री हस्तगत केली आहे.
 
यासंदर्भात स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या कोरेगाव शाखेचे मुख्य प्रबंधक राकेशकुमार अवदेषकुमार चौरसिया (रा. विसावा नाका, सातारा) यांनी गेल्या गुरुवारी (ता. एक) अज्ञाताविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या कोरेगाव येथील कॅश डिपॉझिट मशिनमध्ये कोणीतरी अज्ञाताने दोन हजारांच्या 19 बनावट नोटांचा भरणा केला आहे. या सर्व नोटांवर BAD 313390 असा सिरियल क्रमांक आहे. या नोटा बनावट असल्याचे माहीत असतानाही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्या खऱ्या नोटा आहेत म्हणून अज्ञात संशयिताने हे कृत्य केले असून, गेल्या 29 तारखेला रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

पाटण वन विभागाची दमदार कामगिरी; चार गव्यांना वाचविण्यात यश

दरम्यान, स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या कोरेगाव येथील कॅश डिपॉझिट मशिनमध्ये दोन हजारांच्या बनावट नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त अधीक्षक पाटील, कोरेगावचे उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनपर सूचनेनुसार पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी तातडीने तपास सुरू केला. कोरेगाव पोलिसांनी कौशल्य व मोबाईल तंत्रज्ञानाचा तपास कार्यात वापर केला आणि डिपॉझिट मशिनमध्ये नोटा जमा करणाऱ्या सागर शिर्के यास अवघ्या दोन तासांत अटक केली.

दरम्यान, निरीक्षक मोरे यांनी दोन तपास पथके तयार करून रातोरात बोबडेवाडी व मुंबई येथे रवाना केली आणि प्रिंटर, स्कॅनर मशिन, पेपर, कोरी कागदे, अशी नोटा छपाईसाठी लागणारी सामग्री हस्तगत केली. हा गुन्हा उघडकीस आणण्याकामी उपनिरीक्षक विशाल कदम, पोलिस अंमलदार प्रमोद जाधव यांच्यासह गुन्हे पथकातील अमोल सपकाळ, धनंजय दळवी, अमोल कणसे, सनी आवटे, पूनम वाघ, अविनाश घाडगे यांनी भूमिका बजावली. दरम्यान, संशयित सागर शिर्के यास सोमवारपर्यंत (ता. पाच) पोलिस कोठडी मिळाली असून, निरीक्षक मोरे व त्यांचे मदतनीस अमोल सपकाळ तपास करत आहेत. 

जाणून घ्या बनावट नाेटांचे क्रमांक, तुमच्याकडे त्याच क्रमांकाची नाेट असल्यास जरुर नजीकच्या पाेलिस स्टेशनला कळवा

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Nashik Vidhan Sabha Election : कलम 370 वर काय, शेतकरी आत्महत्यांवर बोला; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

Maharashtra Vidhan Sabha election 2024: पंधरा लाख मतदारांचं ऊसतोडणीसाठी स्थलांतर; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

SCROLL FOR NEXT