सातारा

युवतीची सव्वाकोटींची फसवणूक करणारा भामटा अटकेत, पुणे आरटीओतील नोकरीचे दाखविले आमिष

किरण बाेळे

फलटण शहर : उपप्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून तरुणीसह तिच्या वडिलांची तब्बल सव्वाकोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एक जणास शहर पोलिसांनी अटक केली आहे. प्रमोद हरिचंद्र रणवरे (रा. मलठण, फलटण) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
अरे बापरे! हा तर मृत्यूचा सापळाच

याबाबत झिरपवाडी (ता. फलटण) येथील योगिता शिवाजी गुंजवटे (वय 35) यांनी फलटण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार 2009 मध्ये त्या फलटण येथील दुचाकी गाड्यांच्या शोरूममध्ये काम करताना त्यांची प्रमोद रणवरेशी ओळख झाली. त्या वेळी रणवरेने यांनी "मी तुमचे पुण्याच्या आरटीओ ऑफिसमध्ये काम करतो. थोडे पैसे जातील; परंतु नोकरी नक्की लागेल,' असे सांगितले. त्यानंतर रणवरेशी चर्चा झाल्यानंतर त्यांना पैसे देण्यास योगिता तयार झाल्या. रणवरेने पाच लाखांची मागणी करत कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगितले. 13 मार्च 2009 रोजी रणवरेस 75 हजार रुपये रोख दिल्यानंतर त्यांनी सहा महिन्यांत "तुमची ऑर्डर निघेल' अशी हमी दिली. त्यानंतर 2009 ते 2014 या दरम्यान "नोकरी लावतो' असे सांगत त्याने वेळोवेळी योगिता यांच्याकडून रोख स्वरूपात एक कोटी 25 लाख रुपये घेतले. एवढी मोठी रक्कम देण्यासाठी योगिता यांच्या वडिलांनी 12 एकर शेती व फलटण येथील फ्लॅटही विकला. नातेवाईकांचे सोने गहाण ठेऊन सात लाख रुपये कर्ज व काही नातेवाइकांकडूनही पैसेही घेतले. या दरम्यान रणवरेने योगिता यांना पुणे परिवहन मंडळात पिंपरी-चिंचवड शाखेत निवड झाली असून, 14 जानेवारी 2011 रोजी तेथे हजर राहण्याचे पत्र पोस्टाने पाठविले; परंतु तेथे हजर होण्यास गेल्यानंतर "साहेब बाहेर गेलेत. त्यांनी बोलाविल्यावर येऊ' असे सांगत ते परत फलटणला आले. त्यानंतरही रणवरेने योगिता यांना वारंवार अशीच पत्रे पोस्टाने पाठविली.

डोळ्यात तेल घालून राखण केलेल्यांचे अश्रू ओघळले, नेमके काय झाले डिस्कळमध्ये वाचा

इज्जत वाचविण्यासाठी तिने घेतला रुद्रवतार आणि मग काय घडले?

पाच वर्षे होऊनही नोकरी न मिळाल्याने गुंजवटे यांनी रणवरेस पैसे मागण्यास सुरुवात केली. वारंवार मागणी केल्यानंतर रणवरेने 16 मार्च 2014 रोजी ऍक्‍सिस बॅंकेचा 50 लाख रुपयांचा धनादेश दिला; परंतु थोड्या दिवसाने रोख पैसे देतो असे सांगून तो धनादेश परत घेतला. 2018 पर्यंत रणवरेने पैसे दिले नाहीत. जानेवारी 2019 मध्ये रणवरेविरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात अर्ज दिल्यानंतर त्याने सहा महिन्यांची मुदत मागितली. त्यानंतर 13 फेब्रुवारी 2019 रोजी केलेल्या नोटरीत रणवरेने योगिता यांना 62 लाख 50 हजार रुपयांचे दोन धनादेश दिले. हे दोन्ही धनादेश 27 ऑगस्ट 2019 रोजी बॅंकेत भरले; परंतु ते वटले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर योगिता यांनी तक्रार दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक श्री. राऊळ तपास करीत आहेत.
संपादन - सिद्धार्थ लाटकर

सून कोरोना बाधित झाल्याच्या धक्‍क्‍याने सासऱ्यांचा मृत्यू

गावभेटी, रोडशो झाले; पण कोरोनावर उपाययोजना शून्य!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Vidhansabha: गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या महेश गायकवाडांची शिवसेनेतून हकालपट्टी

पुन्हा trump सरकार! कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, बहुमताचा आकडा केला पार

Hot Water Side Effects :  आरोग्यासाठी चांगलं असलं तरी अशा लोकांनी कधीच पिऊ नये गरम पाणी, त्रास अधिक वाढेल

Devendra Fadnavis: राहुल गांधींच्या हातातील संविधान 'लाल' का? देवेंद्र फडणवीसांनी का घेतली शंका?

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

SCROLL FOR NEXT