Tirthkshetra Vikas Aghadi esakal
सातारा

भाजपला मोठा धक्का; वाईचं नगराध्यक्षपद 'राष्ट्रवादी'च्या ताब्यात

कारभाराची सूत्रे ताब्यात आल्याने 'राष्ट्रवादी'च्या गोटात आनंद

भद्रेश भाटे

वाई (सातारा) : वाईच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे (Mayor Dr. Pratibha Shinde) यांना राज्य सरकारने पदच्युत केल्यानंतर रिक्त झालेल्या या पदाचा कार्यभार नियमानुसार काल पालिकेतील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उपाध्यक्ष अनिल सावंत (Tirthkshetra Vikas Aghadi Leader Anil Sawant) यांनी स्वीकारला. त्यामुळे पालिकेच्या कारभाराची सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) ताब्यात आली आहेत. डॉ. शिंदे या सन २०१६ मध्ये भाजपतर्फे अवघ्या एक मताने थेट जनतेतून नगराध्यक्षपदावर निवडून आल्या होत्या. तेव्हापासून त्या या पदावर कार्यरत होत्या.

पालिकेतील १६ नगरसेवकांनी डॉ. प्रतिभा शिंदेंना पदावरून कमी करण्याची मागणी नगरविकास विभागाकडे केली होती.

दरम्यान, शहरातील शौचालयांच्या बांधकामांचे देयक काढण्याच्या मोबदल्यात १४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती त्यांचे पतीमार्फत स्वीकारल्यामुळे नगराध्यक्षा डॉ. शिंदे व त्यांचे पती यांच्याविरुद्ध १ जून २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर पालिकेतील १६ नगरसेवकांनी त्यांना पदावरून कमी करण्याची मागणी नगरविकास विभागाकडे केली होती. त्याची सुनावणी २० ऑगस्ट २०२० आणि ३ सप्टेंबर २०२० रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली होती. त्यावेळी त्यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद आणि त्यांचे लेखी निवेदन विचारात घेतल्यानंतर बुधवारी (ता.४) महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १६६५ चे कलम ५५ (अ व ब) मधील तरतुदीनुसार नगराध्यक्षा डॉ. शिंदे यांना उर्वरित कालावधीसाठी नगराध्यक्षपदावरून दूर करण्याचा निर्णय नगरविकास विभागाच्या राज्यमंत्र्यांनी घेतला. यापुढील सहा वर्षांसाठी पालिका सदस्य किंवा इतर कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या सदस्य होण्यास अपात्र ठरविण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आदेश नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काढला.

शासनाच्या या निर्णयाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी आज नगराध्यक्ष तसेच पालिका प्रशासनास देऊन नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५७(२) नुसार रिक्त झालेल्या या पदाच्या कार्यभार हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करावी, असा आदेश दिला. त्यानुसार मुख्याधिकारी गैरहजर असल्याने कार्यालय अधीक्षक नारायण गोसावी यांनी या पदाचा कार्यभार उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्याकडे सुपूर्त केला. त्यानंतर आघाडीचे कार्याध्यक्ष संजय लोळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. या वेळी गटनेते भारत खामकर, नगरसेवक प्रदीप चोरगे, चरण गायकवाड, किशोर बागुल, राजेश गुरव, संग्राम पवार, अॅड. श्रीकांत चव्हाण, दीपक ओसवाल, कांताराम जाधव, नगरसेविका सीमा नायकवडी, शीतल शिंदे, स्मिता हगीर, रेश्मा जायगुडे, प्रियंका डोंगरे, आरती कांबळे यांची उपस्थिती होती. श्री. सावंत यांनी नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.

एवढ्या झटपट निर्णय होईल, असे वाटले नव्हते. हे सर्व अनपेक्षित आहे. याबद्दल मला कोणालाही दोष द्यायचा नाही व कोणावरही टीकाटिप्पणी करायची नाही. मात्र, शासनाच्या या निर्णयाबाबत माझ्या वकिलांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेणार आहे.

-डॉ. प्रतिभा शिंदे, माजी नगराध्यक्षा, वाई

आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व सदस्य आणि प्रशासनास विश्वासात घेऊन पारदर्शक कारभार करू. शहरातील सर्व प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू. मिळालेल्या संधीचे सोने करून वाईचा सर्वांगीण विकास करून दाखवू.

-अनिल सावंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 : शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना..! अखेर ५६ जागा जिंकत शिक्कामोर्तब

Nagpur South Assembly Election 2024 Result: प्रतिष्ठेची लढत भाजपने जिंकली, नागपूर दक्षिण मतदारसंघात भाजपचे मोहन मते यांचा विजय

Sports Bulletin 23rd November: पर्थ कसोटीत भारताकडे भक्कम आघाडी ते उद्या आयपीएल २०२५ चा मेगा ऑक्शन रंगणार

Rohit Pawar Won Karjat-Jamkhed Assembly Election 2024 Result Live: रोहित पवारांचा अटीतटीचा विजय; राम शिंदेंना दुसऱ्यांदा दिली मात

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : दक्षिण नागपूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे मोहन मते 15573 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT