Ajit Pawar esakal
सातारा

दादा, आम्हालापण 'संचालक' करा की..

उमेश बांबरे

राष्ट्रवादीतील नेत्यांनी सर्वसमावेशक पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक बिनविरोधचा फंडा काढलाय.

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election) राष्ट्रवादीतील (NCP) इच्छुकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची त्यांच्या दौऱ्यात भेट घेऊन उमेदवारी देण्याची मागणी केली. यामध्ये कोरेगाव, खटाव, माण तालुक्यांतील सर्वाधिक इच्छुकांचा समावेश आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar) व पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांच्यावर श्री. पवार यांनी बॅंकेच्या निवडणुकीबाबतचा निर्णय सोपविला आहे. त्यामुळे सभापती रामराजे व पालकमंत्री या इच्छुकांना संधी देणार का, याची उत्सुकता लागली आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली आहे. आता दहा दिवसांनंतर म्हणजे १८ ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणूक कार्यक्रम लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी यामध्ये लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. बॅंकेत पक्षीय राजकारण नको, असे म्हणत राष्ट्रवादीतील नेत्यांनी सर्वसमावेशक पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक बिनविरोधचा फंडा काढला आहे. अद्यापपर्यंत भाजपकडून कोणतीच भूमिका स्पष्ट झालेली नाही. भाजपमध्ये असलेले आठ संचालक जिल्हा बॅंकेत आहेत. तर उर्वरित राष्ट्रवादीचे संचालक आहेत. भाजपचे पॅनेल होऊच नये, यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी आमदार जयकुमार गोरे व खासदार उदयनराजे भोसले यांना रोखण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पण, अद्यापपर्यंत तरी त्यांना यश आलेले नाही.

तर दुसरीकडे जिल्हा बॅंकेत नेहमी ठरलेले संचालक निवडून आणले जातात. त्यामुळे यावेळेस राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांना संचालक म्हणून संधी मिळावी, अशी मागणी यावेळेस जोर धरू लागली आहे. अशा इच्छुकांनी नुकत्याच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात त्यांना भेटून आम्हाला जिल्हा बॅंकेत संचालक म्हणून घ्या, अशी मागणी केली आहे. याबाबतची काहींनी निवेदनेही दिली आहेत. यामध्ये सातारा, कोरेगाव, खटाव, माण व कऱ्हाड उत्तरमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. अजित पवार यांनी दौऱ्यावेळी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे व मकरंद पाटील हे एकत्र बसून निर्णय घेतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जरी अजित पवारांकडे काहींनी संचालकपदी संधी देण्याची मागणी केलेली असली तरी रामराजे व पालकमंत्री त्यांची मागणी मान्य करणार का, हा प्रश्न महत्त्‍वाचा आहे.

अजितदादा इच्छुकांचे स्वप्न पूर्ण करणार?

राष्ट्रवादीच्या विरोधात दुसरे पॅनेल जिल्हा बॅंकेत पडेल, याची शक्यता अद्यापपर्यंत तरी स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे इच्छुकांना दुसऱ्या पॅनेलचा पर्याय नसल्याने नेत्यांनी मनात आणले तरच संधी मिळणार आहे. या इच्छुकांना राखीव व संस्था मतदारसंघातून संचालक व्हायचे आहे. त्यामुळे अजित पवार या इच्छुकांचे संचालक होण्याचे स्वप्न पूर्ण करणार का, याकडे या सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

कौटुंबिक वारसा जपताना...

SCROLL FOR NEXT