Shivendrasinharaje Bhosle esakal
सातारा

कितीही आव्हानं येऊ द्यात, आम्ही भिणार नाही : आमदार शिवेंद्रसिंहराजे

रविकांत बेलोशे

महाराजांचा पाठीवर पडलेला हात आणि आशीर्वाद मिळाला की, तुमचे राजकारणातील यश निश्चित, हाच जणू खाक्या बनला होता.

भिलार : दत्तात्रय कळंबे महाराज (Dattatraya Kalambe Maharaj) हे जावळीतील राजकारण्यांचे प्रेरणास्थान होते. महाराजांचा पाठीवर पडलेला हात आणि आशीर्वाद मिळाला की तुमचे राजकारणातील यश निश्चित हाच जणू खाक्या बनला होता. महाराज आध्यात्मिक असले तरी त्यांचा सहकार, सामाजिक आणि राजकीय पगडा मोठा होता. परंतु कळंबे महाराजांच्या निर्वाणानंतर येथील नेतेमंडळी स्वयंभू झाली आणि सैरभैरही झाली. आज बेलोशी येथे कळंबे महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात जिल्हा बँकेच्या राजकारणाचे पडसाद उमटले. जणू राजकीय दंगलच या ठिकाणी पाहायला मिळाली. एका बाजूला वसंतराव मानकुमरे (Vasantrao Mankumare) निवडणूक बिनविरोध करण्याचा व्यासपीठावरून नारा करीत असताना दुसरीकडे मात्र आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी महाराजांच्या समाधीवर आपल्या सहकाऱ्यांसमवेत माथा टेकला आणि ‘जावळी’च्या आगामी संघर्षाचा जणू नारळच या ठिकाणी फोडला.

दरवर्षी महाराजांच्या समाधी स्थळावर अध्यात्मिकदृष्ट्या सजग असा कार्यक्रम होतो; परंतु जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील (Satara District Bank Election) यशामुळे वसंतराव मानकुमरे यांचा आत्मविश्वास दुणावला. कोरोना संकटामुळे दोन वर्षे कार्यक्रमात खंड पडला. त्यामुळे मानकुमरेंनी न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम करण्याचा घाट घातला. व्यासपीठावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, मानकुमरे, संचालक ज्ञानदेव रांजणे, हणमंतराव पार्टे, कांतिभाई देशमुख, तुकाराम धनावडे, बी. एम. पार्टे ही मंडळी असताना या ठिकाणी आगामी निवडणुकीची वक्तव्ये चालू असतानाच अचानक पहिल्यांदा आमदार शशिकांत शिंदे त्यांच्याबरोबर माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, माजी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अमित कदम, योगेश गोळे हे मंदिरात आले. कार्यक्रम चालू असतानाच या सर्वांनी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत त्या ठिकाणी काही काळ थांबून आगामी लढाईची व्यूहरचना केली. जणूकाही आगामी संघर्षासाठी महाराजांचे आशीर्वाद घेतले. तेथून बाहेर पडत या सर्व उपस्थितांना हात जोडून नमस्कार करीत जाणे पसंत केले. मानकुमरे व्यासपीठावरून शिंदे यांना थांबण्याची आर्जवे करीत होते; परंतु त्यांनी त्यांच्याकडे लक्ष न देता परतीचा रस्ता धरला. ते जाताच त्यांना बगल देत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सभागृहात प्रवेश केला. त्यामुळे ही संघर्षाची नांदीच सर्वांना पाहायला मिळाली.

Dattatraya Kalambe Maharaj

त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांनी समाधीचे दर्शन घेऊन व्यासपीठावर प्रवेश केला. या वेळी त्यांनी सांगितले, की सध्या कोरोनामुळे सहकार अडचणीत आहे. निवडणुका परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे जेवढी निवडणूक बिनविरोध होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करू; परंतु कुणाला जर आव्हानच द्यायचे असेल तर आम्हीही तयार असून, वसंतराव मानकुमरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या पॅनलच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि त्यांना निवडून आणू. गेल्या निवडणुकीत मोठं मोठ्या वल्गना केल्या; परंतु भाऊ त्यात यशस्वी झाले आहेत हा इतिहास आहे. त्यामुळे कितीही आव्हाने येऊ द्यात आम्ही भिणार नाही. लढण्यासाठी सज्ज राहू, असे त्यांनी सांगितले.

श्री. मानकुमरे म्हणाले,‘‘ आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांनी संपूर्ण तालुक्यातील जागा बिनविरोध निवडून आणल्या. लक्ष्मण तात्या यांची पुण्याई. त्यामुळे नितीन काकांना अध्यक्षपद मिळाले. काका, आता श्रीनिवास पाटील वयोवृद्ध झाले आहेत. पुढील खासदार तुम्हीच व्हायला हवे.’’ निमित्त पुण्यस्मरण सोहळ्याचे होते. परंतु या ठिकाणीं राजकीय आखाडा मात्र रंगला. त्यामुळे अनेकांना गुदगुल्या झाल्या; परंतु दुसरीकडे मात्र वारकरी संप्रदायिक प्रेमींनी मात्र, याबाबत नाराजी व्यक्त केली. राजकारण आणि आध्यात्म याची सांगड महाराजांनी घातली; पण अलीकडच्या काळात महाराजांच्या पश्चात राजकारण आध्यात्माला कसलेच महत्व देत नाही, याचा प्रत्ययही या ठिकाणी आला. एकीकडे कीर्तनकार प्रमोद महाराज जगताप यांचे काल्याचे कीर्तन चालू असताना दुसरीकडे मात्र मिरवणूक आणि फटक्यांची आतषबाजी झाली. त्यामुळे शेवटी कीर्तनकारांनी आपले कीर्तन थांबवले. एकूणच या कार्यक्रमानिमित्ताने जावळीच्या आगामी राजकारणाचे चित्र मात्र स्पष्ट झाले. मग ती बँक असू द्या अथवा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक.

पाटलांसमवेत भिलारेंची मिरवणूक

जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासमवेत भि. दा. भिलारे गुरुजींचे नातू विक्रम भिलारे यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. नितीन पाटील जसे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले, तसेच विक्रम भिलारे हेच आमचे पुढील जावळी बँकेचे अध्यक्ष व नेते आहेत, असा संदेश मानकुमरे यांनी यानिमित्ताने दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT