Swara Yogesh Bhagwat esakal
सातारा

143 किमी सायकलिंग, मिनटात 100 पुशअप्स मारणारी 'सुपरगर्ल'

अशोक सस्ते

आसू (सातारा) : तब्बल दीड वर्षांच्या लॉकडाउनकाळात (Corona Lockdown) अनेकांनी या संकटात मिळालेल्या संधीचं सोनं केलं. अनेक नवनवे छंद जोपासले, तर काहींना वेगळे काही तरी करून दाखवण्याचे नवे मार्ग सापडले. त्यापैकीच एक गोखळी (ता. फलटण) येथील अवघ्या साडेसहा वर्षाच्या स्वरा योगेश भागवत (Swara Yogesh Bhagwat) या चिमुकलीने विविध क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करून अनेक पराक्रम केले. त्यामुळे तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर (Social Media) ती सर्वांचीच फॉन झाली असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Positive News Six Year Supergirl Swara Bhagwat All Rounder Cycling Skating Trekking)

तब्बल दीड वर्षांच्या लॉकडाउनकाळात अनेकांनी या संकटात मिळालेल्या संधीचं सोनं केलं, तर अनेकांनी नवनवे छंद जोपासले आहेत.

लॉकडाउनकाळात स्वराने आपल्या व्यायामाला गती दिली. सात महिने तिने सायकलींगचे प्रशिक्षण (Cycling training) घेतले. त्यानंतर तिने गोखळी-बारामती-मोरगांव-जेजुरी-नीरा-लोणंद- फलटण-राजाळे-गोखळी असे १२ तासांत सायकलिंग करून १४३ कि.मी.अंतर पार करण्याचा पराक्रम केला. यावेळी तिचे वडील तिच्यासोबत होते. याशिवाय वयाच्या तिसऱ्या वर्षी ती पोहायला शिकली. १ मिनिटात १०० पुशअप काढणे, ५० प्रकारच्या दोर उड्या मारणे, कधी एका हातावर, तर कधी दोन्ही हातावर ती जोर मारते. सपाट्या, ट्रेकिंग, स्केटींग (Skating), धावणे आदी छंद तिने जोपासले आहेत. ही सर्व कौशल्य तिने अगदी सहजतेने प्राप्त केली आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर ती हजारो क्रीडाप्रेमींच्या कौतुकाचा विषय ठरली आहे.

तिच्या या यशस्वी कामगिरीबद्दल विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar) यांनी विशेष कौतुक करून सत्कार केला. एवढ्या लहान वयात तिने व्यायामचे जोपासलेले छंद कौतुकास्पद असून भविष्यात ती क्रीडा क्षेत्रात निश्चितच चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास रामराजे यांनी व्यक्त केला. याशिवाय आमदार दीपक चव्हाण (MLA Deepak Chavan), जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर (Sanjeevraje Naik-Nimbalkar), पारनेरचे आमदार नीलेश लंके (MLA Nilesh Lanka) यांनीही फलटण दौऱ्यावर आले असताना तिचे विशेष कौतुक केले. क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह अनेक सामाजिक संस्थांनी अभिनंदन करून तिला मदतीचा हात देत आहेत. स्वरा ही गोखळी येथील जय हनुमान दहीहंडी संघाचे (Jai Hanuman Dahihandi Sangh) अध्यक्ष योगेश भागवत यांची कन्या. वडील योगेश भागवत हे फलटण एस.टी. आगारात वाहक म्हणून कार्यरत आहेत. धावणे, दोरी उडी, जोर, ट्रेकिंग, स्केटींग आदी प्रकारातील कौशल्य पाहून तिच्या वडिलांनी तिला सायकल घेऊन दिली आणि तिला सायकलिंगचे प्रशिक्षणही दिले. तिचे काका रूपेश भागवत हे पोलीस उपनिरीक्षक, तर नीलेश भागवत पोलीस काॅस्टेबल आहेत. आजोबा राजेंद्र भागवत हे ज्येष्ट ग्रामीण पत्रकार आहेत. कुटुंबातील या सर्वांकडून तिला व्यायामाची प्रेरणा मिळाली. त्यामुळेच तिने एकाचवेळी अनेक क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी केली. त्यामुळे तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Positive News Six Year Supergirl Swara Bhagwat All Rounder Cycling Skating Trekking

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT