सातारा

भारीच की! बटाटा संशोधन केंद्रामुळे शेतक-यांचे आर्थिक बजेट सुधारणार

Balkrishna Madhale

सातारा : महाराष्ट्रात बटाटा पिकाची लागवड रब्बी हंगामात सर्वच जिल्ह्यांत कमी-जास्त प्रमाणात आढळून येते. मात्र, खरीप हंगामात या पिकाची लागवड पुणे, सातारा व अहमदनगर या जिल्ह्यांतील काही ठराविक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर होते. महाराष्ट्र राज्यात बटाट्याचे बियाणे निर्माण केले जात नाही. उत्तर भारतातून आणलेल्या बियाणावरच शेतकर्‍यांना अवलंबून रहावे लागते.

याच पार्श्वभूमीवर कोरेगाव, खटाव, महाबळेश्वर, फलटण आदी तालुक्यांत बटाटा पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने याबाबत जिल्हा परिषद कृषी समितीने ठराव करुन राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे पाठवला होता. हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असून या प्रस्तावानुसार वाकेश्वर (ता. खटाव) येथे बटाटा संशोधन केंद्र स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती मंगेश धुमाळ यांनी भेट घेऊन हा प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली आहे.

कोरेगाव, खटाव, महाबळेश्वर, फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात आणि अन्य तालुक्यात काही प्रमाणात बटाटा लागवड करण्यात येते. अनेकदा बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होत नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होते. बटाटा बियाण्याबाबत अनेकदा तक्रारी होतात. परिणामी, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अनेक बटाटा उत्पादक शेतक-यांनी मंगेश धुमाळ यांच्याकडे हा प्रश्न उपस्थित केला होता. शेतक-यांचे नुकसान होऊ नये यासाठी धुमाळ यांनी याबाबत माहिती घेतली असता, यापूर्वी खटाव तालुक्यात बटाटा संशोधन केंद्र सुरु करण्याबाबत हालचाली झाल्या. मात्र, यामध्ये यश आले नव्हते. धुमाळ यांनी या प्रश्नाला प्राधान्य देत कृषी समिती सभेत बटाटा संशोधन केंद्राबाबत ठराव करुन महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे पाठवला होता. 

या प्रस्तावाची महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे गांभिर्याने दखल घेऊन वाकेश्वर येथील जागेची पाहणी करण्यात आली. त्यानुसार याठिकाणी बटाटा संशोधन केंद्र करण्याबाबत विद्यापीठातर्फे शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेस पाठवण्यात आले आहे. शासनाने हा प्रस्ताव तात्काळ मंजूर करावा यासाठी धुमाळ यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

प्रस्ताव तातडीने मंजूर करुन जिल्ह्यातील बटाटा उत्पादक शेतक-यांना न्याय देण्याची मागणी धुमाळ यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनीही सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे धुमाळ यांनी सांगितले. दरम्यान, वाकेश्वर येथे बटाटा संशोधन केंद्र होणार असल्याने शेतक-यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. या केंद्रामुळे येथील शेतक-यांना मोठा लाभ होणार असून बटाटा शेतीही किफायती आणि फायद्याची ठरणार आहे.

सातारा जिल्ह्यात बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नेहमीच शेतकरीहिताला प्राधान्य दिले आहे. त्याच धर्तीवर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सोयीसुविधा पुरवण्यावर भर राहिला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बटाटा उत्पादन घेतले जाते. येथील बटाटा देशाच्या कानाकोपऱ्यात जातो. मात्र, उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन जलद मिळत नसल्याने त्यांचे अनेकदा नुकसान होते. या पार्श्वभूमीवर बटाटा संशोधन केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील बटाटा उत्पादकांना निश्चितच न्याय मिळणार आहे. वाकेश्वर येथे बटाटा संशोधन केंद्र होणार असल्याने याचा सर्वाधिक लाभ जिल्ह्याला होणार असून शेतक-यांचे आर्थिक बजेटही सुधारणार आहे.

-मंगेश धुमाळ, कृषी व पशुसंवर्धन सभापती, जिल्हा परिषद, सातारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT